Jump to content

मेघना पेठे

मेघना पेठे
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रकादंबरी, कथा
भाषामराठी
साहित्य प्रकार कथा
प्रसिद्ध साहित्यकृती हंस अकेला

मेघना पेठे या मराठी कवी, कादंबरीकार व कथाकार आहेत.

त्यांनी आपल्या साहित्यलेखनाची सुरुवात कवितांनी केली, पण भावना व्यक्त करतांना मर्यादा येतात असे वाटल्याने त्या कथा-कादंबरी लेखनाकडे वळल्या. त्यांच्या मते माणूस हा सतत बदलत असतो, तसेच वेगळे काही तरी करत असतो आणि हेच वेगळेपण लिहिण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.[]

‘मेघनाच्या कविता १९७४-८५’ अशा शीर्षकाने मेघना पेठे यांनी आपल्या निवडक २५ कविता हस्तलिखित-चक्रमुद्रांकित स्वरूपात निवडक मित्र-मैत्रिणींसाठी प्रसिद्ध केल्या होत्या.

'आये कुछ अब्र' नावाच्या मराठी लघुपटाची कथा आणि पटकथा मेघना पेठे यांची होती. हा २८ मिनिटांचा लघुपट इंग्रजीत 'Let Some Clouds Float In' या नावाने रूपांतरित झाला होता. लघुपटाचे दिग्दर्शन मयुरेश गोटखिंडीकरांचे होते. प्रमुख भूमिकेत देविका दप्तरदार होत्या. ('आये कुछ अब्र कुछ शराब आये' ही कवी फ़ैज़ अहमद फ़ैज़ यांची प्रख्यात गझल आहे.)


प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)/दिवस
आंधळ्याच्या गाईकथा संग्रहराजहंस प्रकाशन२०००
नातिचरामिकादंबरीराजहंस प्रकाशन२६ जानेवारी, २००५
हंस अकेलाकथा संग्रहराजहंस प्रकाशन१९९७

पुरस्कार

  • पहिला 'प्रिय जी. ए. कथाकार सन्मान', २००९
  • 'आंधळ्यांच्या गायी'साठी इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचा पुरस्कार (२००१)
  • 'आंधळ्यांच्या गायी'साठी सोलापूरचा भैरूरतन दमाणी पुरस्कार (२००१)
  • 'हंस अकेला'ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उत्कृष्ट कथासंग्रहासाठीचे आनंदीबाई शिर्के पारितोषिक (१९९७-९८)
  • 'हंस अकेला'ला 'इचलकरंजी एज्यकेशनल ॲन्ड चॅरिटेबल' ट्रस्टचा पुरस्कार (१९९७-९८)
  • 'हंस अकेला'ला श्री. दा. पानवलकर स्मृती पुरस्कार (१९९८)
  • 'हंस अकेला'ला प्रियदर्शिनी अकादमी पुरस्कार (१९९८)

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ "loksatta.com". www.loksatta.com. 2020-08-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-03-02 रोजी पाहिले.