मेखला
स्त्रियांचे एक कंबरेस बांधण्याचे सोन्याचे आभूषण. तो एका बाजूने अडकवण्यात येतो. व पूर्वी मेखला सोन्याच्या आठपदरी साखळीमध्ये वापरत असत.आता तीन पदर असलेले मेखले वापरले जात असे.
इतिहास
पूर्वी त्यांच्या एक पदर, आठ पदर , सोळा पदर यानुसार त्याचे प्रकार पडत असे. स्त्री व पुरुष यांच्या कमरेत घालायच्या दागिन्याणा कटीभूषणे म्हंटले जात असे. खालील श्लोकात कालिदासाने मेखलेला अनेक पदर असतात
स्मरसी स्मर मेखलागूणैरुत गोत्रस्ख्लीतेषु बन्धनम
अर्थ – हे मदना, नाव घेताना चूक झाल्यामुळे मी मेखलेच्या पदरांनी तुला बांधले, ही गोष्ट तू स्मरतोस काय [१]
प्रकार
- कांची -एक पदर सोन्यची साखळी
- मेखला -आठ पदर सोन्यची साखळी
- रसना- सोळा पदरी कमर पट्टा याचा आवाज पण येत असे.
यांचा उपयोग वस्त्र सांभाळ करीता होत नसून, केवळ शोभेकरीता होत असावा,असा उलेख आहे[२]