Jump to content

मेक लव्ह नॉट स्कार्स

मेक लव्ह नॉट स्कार्स ही नवी दिल्लीस्थित भारतातील विना नफा तत्त्वावर काम करणारी संस्था आहे.[] ॲसिड हल्ला मुख्यत्वे महिलांवर होतो. ही संस्था ॲसिड हल्ल्यातून वाचलेल्या लोकांसोबत काम करते. ही संस्था रिया शर्मा यांनी स्थापन केली. तानिया सिंह मेक लव्ह नॉट स्कार्स संस्थेच्या सीईओ आहेत.[] ही संस्था ॲसिड हल्ल्यातील पीडितांच्या संपूर्ण पुनर्वसनासाठी मदत करते. या मध्ये वाचलेल्या लोकांना आर्थिक, कायदेशीर आणि शैक्षणिक मदत पुरवणे समाविष्ट आहे.[] ६ नोव्हेंबर २०१६ पर्यंत संस्थेने संपूर्ण भारतात सुमारे ७० वाचलेल्या लोकांना मदत केली होती.[] ही स्वयंसेवी संस्था सध्या निधी गोळा करण्यासाठी आणि ती पीडितांना न पाठण्याच्या आरोपाखाली चौकशीच्या कक्षेत आहे.[]

इतिहास

रिया शर्माने २०१४ मध्ये मेक लव्ह नॉट स्कार्सची स्थापना केली. तेव्हा ती लीड्स कॉलेज ऑफ आर्टमध्ये फॅशनची विद्यार्थिनी होती. तिच्या शेवटच्या वर्षाच्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून, तिने भारतातील ॲसिड हल्ल्यातून वाचलेल्यांवर एक माहितीपट बनवायला सुरुवात केली होती.[] तथापि, भारतात ॲसिड हल्ल्यातून वाचलेल्यांच्या भयावह परिस्थिती पाहिल्यानंतर तिने त्याऐवजी एक संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. तिने पब्लिक रेडिओ इंटरनॅशनलच्या इसिस माद्रिदला सांगितले कि

"मी डॉक्युमेंट्रीचे शूटिंग करत असताना, मी स्वतःला सरकारी हॉस्पिटलच्या बर्न वॉर्डमध्ये गेले होते. या प्रभागात पाहिलेल्या गोष्टींनी मला कायमचे बदलले. मी एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात दुःख कधी बघितले नव्हते, इतक्या वेदनांनी मी कधीच घेरले गेले नव्हते. जेव्हा तुम्ही त्या स्थितीत असाल तेव्हा तुमच्याकडे दोन पर्याय असतील, तुम्ही एकतर तुमच्या स्वतःच्या आयुष्याच्या आरामात परत येऊ शकता किंवा तुम्ही दुसऱ्यांचे आयुष्य आरामदायी करण्याचा प्रयत्न करू शकता."[]

या संस्थेच्या संस्थापकांना मिताक काझीमीच्या शो कॉन्व्हर्सेशन्समध्ये देखील वैशिष्ट्यीकृत केले होते. ज्यात तिने सामाजिक सक्रियतेची गरज तरुणांशी संबंधित असण्याची गरज शोधली जेणेकरून ते विविध सामाजिक आजारांना मदत करू शकतील.

स.न. २०१६ मध्ये या मोहिमेचा चेहरा म्हणून रेश्मा कुरेशी यांची निवड केली होती.

पुनर्वसन केंद्र

मेक लव्ह नॉट स्कार्सने मार्च २०१६ मध्ये नवी दिल्लीत भारताचे पहिले पुनर्वसन केंद्र सुरू केले. अशा प्रकारचे हे पहिलेच केंद्र होते. हे केंद्र ॲसिड हल्ला झालेल्यांना वैद्यकीय उपचार, आर्थिक मदत, कायदेशीर सहाय्य, व्यावसायिक प्रशिक्षण आणि मानसिक उपचार प्रदान करते. योग आणि कविता वर्ग यासारख्या मनोरंजनात्मक उपक्रमांद्वारे वाचलेल्यांना त्यांच्या भावनिक संघर्षांवर मात करण्यास मदत केली जाते.[]

हे केंद्र इंग्रजी आणि संगणक वर्गांसह विविध वर्गांचे आयोजन करते. येथील कार्यशाळांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, मेकअप शिकवणे आणि कायदेशीर कौशल्य यासारख्या उपक्रमांचा समावेश असतो.[]

येथे ॲसिड हल्ल्याच्या गुन्हेगारांपासून आश्रय देण्याचीही सुविधा या केंद्रात आहे. हे केंद्र अंशतः सामुदायिक देणग्यांद्वारे आणि मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट फंडर्सद्वारे मिळणाऱ्या मदतीने चालवले जाते.[१०] ऑटोमोटिव्ह दिग्गज मॅग्नेटी मारेलीने वर्ष २०१६ मध्ये पुनर्वसन केंद्राच्या दैन्ंदीन खर्चासाठी अंदाजे ३१,००० डॉलर्स दान केले होते. इतर कॉर्पोरेट देणगीदारांमध्ये अर्बन क्लॅप आणि अर्बन लॅडर यांचा समावेश आहे.[]

मोहिमा

#एंड-ॲसिड-सेल

३० ऑगस्ट २०१५ रोजी, मेक लव्ह नॉट स्कार्सने ब्यूटी ट्यूटोरियलची मालिका बनवली. यामध्ये ॲसिडच्या काउंटर विक्रीवर संपूर्ण बंदीची मागणी करण्यात आली होती. #एंड-ॲसिड-सेल ही मोहिम क्रिएटिव्ह एजन्सी ओगिल्वी आणि माथर या कंपनीच्या सहकार्याने तयार केली गेली. मोहिमेचा चेहरा ॲसिड हल्ल्यातून वाचलेली रेश्मा कुरेशी होती आणि ती आयलाइनर, लिपस्टिक लावण्यावर आणि काळ्या डागांपासून मुक्त कसे व्हावे यावरील शिकवणींच्या मालिकेद्वारे सौंदर्य टिप्स देताना दिसते.[११]

#एंड-ॲसिड-सेलच्या विपननासाठी तयार केलेल्या मार्गदर्शक व्हिडिओमधून भारत सरकारला शौचालय स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ऍसिड विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली. तसेच विष कायदा आणि विष नियम अजून कडक करण्याचे मागणी केली. "ब्यूटी टिप्स बाय रेश्मा" नावाचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यांना आजपर्यंत २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या याचिकेने पहिल्या दोन आठवड्यांतच २,२५,०००हून अधिक स्वाक्षऱ्या मिळवल्या होत्या.[११] डिसेंबर २०१५ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भारतीय राज्यांना ॲसिडच्या काउंटर विक्रीवर बंदी लागू करण्याचे निर्देश दिले.[१२]

#एंड-ॲसिड-सेल ही मोहीम व्हायरल झाली आणि ती भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दाखवली गेली. या मोहिमेचे यश द न्यू यॉर्क टाइम्स, द वॉल स्ट्रीट जर्नल, बीबीसी वर्ल्ड, मेल ऑनलाईन, एबीसी न्यूझ, टाइम (मासिक), मॅशेबल, डेली मिरर, पीपल (मासिक), द इंडिपेंडंट, द हफिंग्टन पोस्ट या माध्यमांतून दाखवले गेले. राजकारणी आणि सेलिब्रिटी जसे अमिताभ बच्चन आणि ॲश्टन कचर यांनी देखील याची दखल घेतली.[१३]

पुरस्कार

#एंड-ॲसिड‌-सेल मोहिमेला विपणनासाठी अनेक पुरस्कार देण्यात आले. यात खालील पुरस्कार समाविष्ट आहेत:

  • एशियन स्ट्रॅटेजी २०१६ साठी वॉर्क एशियन प्राइजमध्ये गोल्ड पुरस्कार
  • इनोव्हेटिव्ह चॅनेल थिंकिंग पुरस्कार.[१४]

संदर्भ

  1. ^ Thomas, Maria. "An Indian acid attack survivor is taking her inspiring story to New York Fashion Week". Quartz (इंग्रजी भाषेत). 2017-03-25 रोजी पाहिले.
  2. ^ The Hindu. 2020. Attack Survivors Suffer Trauma. [online] Available at: <https://www.thehindu.com/news/national/telangana/attack-survivors-suffer-trauma/article28452659.ece> [Accessed 28 March 2020].
  3. ^ Madrid, Isis, Sakuntala Narasimhan, and WeNews Staff. "This 23-year-old woman just opened India’s first rehab clinic for acid attack survivors." Women's eNews. N.p., 06 Apr. 2016. Web. 14 Mar. 2017.
  4. ^ NewIndianXpress. "Life beyond the acid burn." The New Indian Express. N.p., n.d. Web. 14 Mar. 2017
  5. ^ "Mumbai: Cheating FIR against NGO founder for duping acid attack victims of lakhs". mid-day (इंग्रजी भाषेत). 2018-01-03. 2019-02-23 रोजी पाहिले.
  6. ^ "Ria Sharma." Leeds College of Art. N.p., n.d. Web. 14 Mar. 2017.
  7. ^ "This 23-year-old woman just opened India's first rehab clinic for acid attack survivors." Public Radio International. N.p., n.d. Web. 14 Mar. 2017.
  8. ^ "23-year-old woman runs first rehab clinic for acid attack survivors in India." The New York Times. The New York Times, 13 Apr. 2016. Web. 14 Mar. 2017.
  9. ^ a b "Delhi to get first-of-its-kind rehab centre for acid attack survivors". dna (इंग्रजी भाषेत). 2016-02-25. 2017-07-29 रोजी पाहिले."Delhi to get first-of-its-kind rehab centre for acid attack survivors". dna. 2016-02-25. Retrieved 2017-07-29.
  10. ^ Sivasubramanian, Shami . "Woman opens India's first rehab clinic for acid attack survivors." Topics. N.p., n.d. Web. 14 Mar. 2017.
  11. ^ a b V. (2015, December 18). Acid Attack Survivor Shares Beauty Tips In Petition Campaign #EndAcidSale. Retrieved June 05, 2017, from http://lighthouseinsights.in/endacidsale-make-love-not-scars.html/
  12. ^ APA MLA Chicago Beauty Tips by Reshma. (n.d.). Retrieved June 05, 2017, from http://awards.kyoorius.com/2016/creative/beauty-tips-by-reshma-direct-response-film-advertising Archived 2018-03-15 at the Wayback Machine.
  13. ^ W. (n.d.). Ogilvy's #EndAcidSale campaign goes viral. Retrieved June 05, 2017, from http://www.exchange4media.com/marketing/ogilvys-endacidsale-campaign-goes-viral_61714.html Archived 2017-12-12 at the Wayback Machine.
  14. ^ Warc Prize for Asian Strategy 2016: BBDO's 'Share The Load' bags Grand Prix. (n.d.). Retrieved June 05, 2017, from http://www.campaignindia.in/article/warc-prize-for-asian-strategy-2016-bbdos-share-the-load-bags-grand-prix/431203