मेक माय ट्रीप
मेक माय ट्रीप (MakeMyTrip) ही २००० मध्ये स्थापन झालेली भारतीय ऑनलाइन प्रवासी कंपनी आहे. गुरुग्राम, हरियाणा येथे मुख्यालय असलेली ही कंपनी विमान तिकिटे, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सुट्टीचे पॅकेज, हॉटेल आरक्षण, रेल्वे आणि बस तिकिटांसह ऑनलाइन प्रवासी सेवा पुरवते. या कंपनीची १०० शहरांत १४६ कार्यालये आहेत.[१] तसेच न्यू यॉर्क, सिंगापूर, क्वालालंपूर, फुकेत, बँकॉक, दुबई आणि इस्तंबूल येथे आंतरराष्ट्रीय कार्यालये देखील आहेत. [२]
संदर्भ
- ^ Haris, Mohammad (2023-03-29). "MakeMyTrip To Expand Footprint in India, Aims to Grow Franchisees By 50% In 2023". News18 (इंग्रजी भाषेत). 2023-08-10 रोजी पाहिले.
- ^ "Story of MakeMyTrip, the Revolutionary E-commerce". The CEO Magazine India (इंग्रजी भाषेत). 2023-08-10 रोजी पाहिले.