Jump to content

मेंदर्गी

  ?मेंदर्गी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ५५७ मी
जवळचे शहर[[सोलापूर ]]
विभागपुणे
जिल्हासोलापूर
तालुका/केअक्कलकोट
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
११,९४८ (२०११)
• १०.०३/किमी
त्रुटि: "1:0.96" अयोग्य अंक आहे /
भाषामराठी

मेंदर्गी #Maindargi# हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील गाव आहे. कुरुंदवाड संस्थानात हे तालुक्याचे ठिकाण होते. मैदंर्गीची सुरुवात इ. स. १५०० च्या शतकाच्या मध्याला झाली आहे. सुरुवातीला मेंदर्गी येथे वीरशैव लिंगायत धर्माचे बिदर येथे देशमुख करणारे देशमुख म्हणजे सध्या आडनाव बदल झालेले केसूर, पाटील आणि कलमनी बंधू या ठिकाणी आले असल्याची माहिती वीरशैव लिंगायत धर्माचे धर्मपीठ उज्जैनी येथे नोंदले आहे.

गावात प्रवेशासाठी हिप्परगा, सलगर, उडगी आणि कमळा असे चार वेस आहेत, कमळा हे गावाचे नाव नसून जुन्या काळच्या एका बागेचे व विहिरीचे नाव आहे. कमळा वेस भागात ग्रामदैवत महादेव मंदिर आहे. सध्याचे मंदिर साधे आहे, जुने प्राचीन मंदिर पडले आहे, मंदिराचे अवशेषानी बावासाहेब विहिरीचे बांधकाम झाले. आजही अवशेष दिसतात. महादेवाची जत्रा ही रुढी, परंपरेनुसार ऐतिहासिक व अनोखी आहे. अनेक वर्षांपासून जत्रेच्या निमित्ताने आठवडे बाजार भरवला जातो. जत्रेची सुरुवात इ. स. १५०० मध्यास सुरुवात झाली आहे.

मेंदर्गी गावात शिवयोगी शिवचलेश्वर यांची अलौकिक कथा असलेले चरित्र घडले. शिवयोगी शिवचलेश्वरास ग्रामदैवताचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यांचा महिमा इ. स. १८९० च्या दशकात लोकांना जाणवला. त्यांचा पालखी महोत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होतो. पालखी महोत्सवाची सुरुवात इ.स १९४२ ला, तर रथोत्सवाची इ.स.१९६२ला झाली. ग्रामदैवत महादेव जत्रेच्या मानकरी व त्याच पद्धतीने रथोत्सव साजरा केला जातो.

जंगलातून सुरुवात झालेल्या या गावाला कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी कुरुंदवाड संस्थानास जोडले. त्याला तालुक्याचा दर्जा दिला. कुरुंदवाड संस्थानाची जहागीर पटवर्धन घराण्याला मिळाली. नंतरच्या काळात जवळच बोरी नदीच्या पलीकडे मेंदर्गीहून कमी लोकसंख्या असलेल्या अक्कलकोटवर शाहू महाराजांनी स्वारी केली अक्कलकोटवर वीरशैव लिंगायत धर्माच्या पाटलांचे वर्चस्व होते महाराजांना पाटलांनी कडवी झुंजं दिली, शेवटी पाटलानां शरणागती पत्करावी लागली.

इ.स १७०३ला महाराजांनी पाटलांना दत्तक घेऊन अक्कलकोट येथे नवीन राज्य स्थापन करून गावे जोडली. पाटलांना राज्याभिषेक करून त्यांना राज्य कारभार सुपूर्द केला. पटवर्धन घराण्यातही विभाजन होऊन कुरुंदवाड संस्थानाचे छोटे कुरुंदवाड व मोठे कुरुंदवाड असे दोन भाग झाली. त्यांच्या संस्थानिकांना अनुक्रमे धाकटी पाती आणि थोरली पाती म्हणतात. अक्कलकोट येथे मोठे कुरुंदवाड संस्थानात स्थानिक स्वराज्य संस्था स्थापना केली. मेंदर्गी येथे सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जुनी आणि पहिली नगरपालिका आहे.

अक्कलकोट येथे भोसले, देशमुख, देशपांडे, धर्माधिकारी, बिराजदार राज्यकारभारात हस्तक्षेप करत होते तर मेंदर्गी येथे पटवर्धन,देशमुख, देशपांडे, धर्माधिकारी, पाटील, बिराजदार (केसूर), कुलकर्णी राज्यकारभारात हस्तक्षेप करत होते.

पिण्याचे पाणी

गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात हॅन्डपंपच्या, ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा आहे.

संपर्क व दळणवळण

गावात पोस्ट व तार ऑफिस उपलब्ध आहे. सर्वात जवळील उपपोस्ट ऑफिस १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावाचा पिन कोड ४१३२१७ आहे. गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे. गावात मोबाईल फोन सुविधा ; इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे ; गावात शासकीय बस सेवा ; खाजगी बस सेवा उपलब्ध आहे. गावात रेल्वे स्थानक नाही . गावात ऑटोरिक्षा ; टमटम; टॅक्सी व व्हॅन उपलब्ध आहे.

बाजार व पतव्यवस्था

गावात एटीएम उपलब्ध आहे. गावात व्यापारी बँका; सहकारी बँका; शेतकी कर्ज संस्था उपलब्ध आहे. गावात स्वयंसहाय्य गट आहेत. गावात रेशन दुकान आहे. गावात मंडया/कायमचा बाजार व आठवड्याचा बाजार आहे.

साक्षरता

  1. एकूण साक्षर लोकसंख्या: ७०५१
  2. साक्षर पुरुष लोकसंख्या: ४०५०
  3. साक्षर स्त्री लोकसंख्या: ३००१
Shree