Jump to content

मे ६

मे ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२६ वा किंवा लीप वर्षात १२७ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सोळावे शतक

  • १५४२ - संत फ्रांसिस झेव्हिअर तत्कालीन पोर्तुगीज गोव्याची राजधानी ओल्ड गोवा येथे पोहोचला.

सतरावे शतक

  • १६३२ - मुघल सम्राट शाहजहान व आदिलशहा यांच्यामधे शहाजीला पराभूत करण्याबद्दल तह झाला.

अठरावे शतक

  • १७३९ - चिमाजीअप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी वसई मोहीम जिंकून उत्तर कोकण मराठा साम्राज्यात आणले.

एकोणिसावे शतक

  • १८४० - पेनी ब्लॅक नावाचे जगातील पहिले टपाल तिकीट प्रसारित झाले.

विसावे शतक

  • १९४९ - ईडीएसएसी पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित संगणक सॉफ्टवेर सुरू झाले.
  • १९५४ - रॉजर बॅनिस्टर हे १ मैल चार मिनिटांच्या आत धावणारे पाहिले व्यक्ती ठरले.
  • १९८३ - अडोल्फ हिटलर यांच्या डायरीचा लबाडी म्हणून खुलासा केला गेला.
  • १९८४ - कृत्रिम श्वसन न करता एव्हरेस्ट पादाक्रांत करणारा फू दोरजी हा पहिला भारतीय ठरला.
  • १९९४ - इंग्लिश खाडी खालून जाण‍ाऱ्या आणि इंग्लंड फ्रान्स यांना जोडण‍ाऱ्या युरो टनेलचे इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रॅंकॉइस मित्रॉं यांच्या हस्ते  उद्‍घाटन झाले.
  • १९९७ - बँक ऑफ इंग्लंडला स्वायत्तता देण्यात आली.
  • १९९९ - महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला.

एकविसावे शतक

  • २००१ - पोप जॉन पॉल दुसऱ्याने सिरियातील एका मशिदीस भेट दिली. मशिदीस भेट देणारे ते पहिलेच पोप होत.
  • २००२ - भूपिंदर नाथ किरपाल भारताचे ३१वे सरन्यायाधीश झाले.
  • २०१५ - भारतीय चित्रपट अभिनेता सलमान खानला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली ५ वर्ष्याच्या कारावासाची शिक्षा. हायकोर्टाने अपील वर लगेच जामिनावर सुटका केली.

जन्म

मृत्यू

  • ६८० - खलिफा म्वाइयाह्.
  • १५८९ - संगीतसम्राट तानसेन तथा रामतनू पांडे ऊर्फ मोहम्मद अट्टा खान, मुघल सम्राट अकबराच्या दरबारातील एक नवरत्‍न
  • १८६२ - हेन्‍री थोरो, अमेरिकन लेखक. (ज. १२ जुलै १८१७)
  • १९२२ - छत्रपती शाहू महाराज.
  • १९४६- भुलाभाई देसाई भारतीय स्वातंत्र्यसेनानी व कायदेपंडित
  • १९५२ - मारिया मॉंटेसरी, इटालियन डॉक्टर शिक्षणतज्ञ.
  • १९६६ - रॅंगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे, भारतीय उदारमतवादी समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणज्ज्ञ.
  • १९९५ - आचार्य गोविंदराव गोसावी, प्रवचनकार, संत वाङ्‍मयाचे अभ्यासक, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक.
  • १९९९ - कृष्णाजी शंकर हिंगवे, पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य.
  • २००१ - मालतीबाई बेडेकर, मराठी कादंबरीकार, लेखिका.
  • २०१७ - उस्ताद रईस खां, भारतीय सतारवादक.

प्रतिवार्षिक पालन

  • हॉलोकॉस्ट स्मृति दिन - इस्राइल
  • आंतरराष्ट्रीय "नो-डाएट" दिवस.

बाह्य दुवे


मे ४ - मे ५ - मे ६ - मे ७ - मे ८ - (मे महिना)