मे १५
मे १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३५ वा किंवा लीप वर्षात १३६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
तेरावे शतक
- १२५२ - पोप इनोसंट चौथ्याने पोपचा फतवा काढून ख्रिश्चन धर्म न पाळणाऱ्यांचा शारीरिक छळ करण्यास मुभा दिली.
सोळावे शतक
- १५२५ - फ्रॅंकेनहाउसेनची लढाई.
सतरावे शतक
- १६०२ - बार्थोलोम्यु गॉस्नॉल्ड हा केप कॉडला पोचणारा प्रथम युरोपीय झाला.
- १६१८ - योहान्स केपलरने आपल्या ग्रहगतीचा तिसरा सिद्धांताला पुष्टी दिली.
अठरावे शतक
- १७१८ - जेम्स पकलने मशीन गनचा पेटंट घेतला.
- १७५६ - इंग्लंडने फ्रांसविरुद्ध युद्ध पुकारले.
- १७९५ - नेपोलियन बोनापार्टने मिलान जिंकले.
एकोणिसावे शतक
- १८११ - पेराग्वेला स्पेनपासून स्वातंत्र्य.
- १८५१ - राम चौथा थायलंडच्या राजेपदी.
- १८९७ - ग्रीस-तुर्कस्तान युद्ध - ग्रीसच्या सैन्याची धूळधाण.
विसावे शतक
- १९०५ - लास व्हेगास शहराची स्थापना.
- १९१८ - फिनलंडचे गृहयुद्ध समाप्त.
- १९१९ - ग्रीसने तुर्कस्तानच्या इझमीर गावावर हल्ला केला.
- १९३२ - जपानमध्ये उठाव. पंतप्रधान इनुकाई त्सुयोशीची हत्या.
- १९३४ - कार्लिस उल्मानिसने लात्व्हियाची सत्ता बळकावली.
- १९४० - दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या सैन्याने ऍम्स्टरडॅम जिंकले.
- १९४८ - ईजिप्त, ट्रान्सजॉर्डन, सिरिया, इराक व सौदी अरेबियाने इस्रायेलवर हल्ला केला.
- १९५७ - युनायटेड किंग्डमने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली.
- १९५८ - सोवियेत संघाने स्पुतनिक ३ या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
- १९६० - सोवियेत संघाने स्पुतनिक ४ या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
- १९७० - व्हियेतनाम युद्ध - जॅक्सन स्टेट युनिव्हर्सिटीत निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा गोळीबार. १ ठार.
- १९७२ - अमेरिकेने जपानचे ओकिनावा बेट परत केले.
- १९७८ - नौरूच्या अध्यक्ष लागुमॉट हॅरिसचा राजीनामा.
- १९९१ - एडिथ क्रेसॉॅं फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
एकविसावे शतक
जन्म
- १७२० - मॅक्सिमिलियन हेल, स्लोव्हेकियन अंतराळतज्ञ.
- १८१७ - देवेंद्रनाथ टागोर, बंगाली समाजसुधारक.
- १८५७ - विल्यामिना फ्लेमिंग, स्कॉटिश अंतराळतज्ञ.
- १८५९ - पिएर क्युरी, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
- १९१४ - तेनसिंग नोर्गे, एव्हरेस्ट वर प्रथम चढाई करणाऱ्या एडमंड हिलरी यांचे सहकारी.
- १९३५ - टेड डेक्स्टर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३७ - मेडेलिन ऑलब्राईट, अमेरिकन परराष्ट्रमंत्री.
मृत्यू
- १०३६ - गो-इचिजो, जपानी सम्राट.
- ११७४ - नुरुद्दीन, सिरीयाचा राजा.
- १४७० - चार्ल्स आठवा, स्वीडनचा राजा.
- १७६० - अलौंगपाया, म्यानमारचा राजा.
- १७८२ - सेबास्टियाव होजे दि कारवाल्हो ई मेलो, पोर्तुगालचा पंतप्रधान.
- १९९३ - फिल्डमार्शल के. एम. करिअप्पा, स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख.
- १९९४ - पी. सरदार, चित्रकार व दिनदर्शिका चित्र निर्माता.
प्रतिवार्षिक पालन
- विश्व कुटुंबसंस्था दिन.
- स्वातंत्र्य दिन - पेराग्वे.
- सेना दिन - स्लोव्हेकिया.
- शिक्षक दिन - मेक्सिको, दक्षिण कोरिया.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर मे १५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)