मे १२
मे १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३२ वा किंवा लीप वर्षात १३३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
चौदावे शतक
- १३२८ - रोम येथे प्रतीपोप निकोलस पाचव्याचा राज्याभिषेक.
सोळावे शतक
सतरावे शतक
- १६६६ - आग्रा येथे शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झाली.
- १६८९ - इंग्लंडचा राजा विल्यम तिसऱ्याने फ्रांस विरुद्ध युद्ध पुकारले.
अठरावे शतक
- १७८० - अमेरिकन क्रांती - ब्रिटिश सैन्याने चार्ल्स्टन, दक्षिण कॅरोलिना जिंकले.
- १७९७ - नेपोलियन बोनापार्टने व्हेनिस जिंकले.
एकोणिसावे शतक
- १८६२ - अमेरिकेचे सैन्य लुईझियानाच्या बॅटन रूज शहरात शिरले.
- १८६४ - अमेरिकन यादवी युद्ध-स्पॉट्सिल्व्हेनियाची लढाई - तुंबळ युद्धात उत्तर व दक्षिणेचे हजारो सैनिक मृत्युमुखी.
- १८८१ - ट्युनिसीया फ्रांसच्या आधिपत्याखाली.
- १८९० - इंग्लंडमध्ये सर्वप्रथम काउंटी सामने सुरू. यॉर्कशायरने ग्लॉस्टरशायरला ८ गडी राखून हरवले.
विसावे शतक
- १९०९: सेवानंद बाळुकाका कानिटकर, डॉ. गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर आणि वि. ग. केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली.
- १९२६ : रोअल्ड अॅमंडसेन याच्या नेतृत्वाखाली नॉर्ज या विमानाने उत्तर ध्रुवापर्यंत पहिली विमानफेरी केली.
- १९३२ - अपहरण झाल्यावर अडीच महिन्यांनी चार्ल्स लिंडबर्गचा मुलगा मृत अवस्थेत सापडला.
- १९३७ - जॉर्ज सहावा इंग्लंडच्या राजेपदी.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - खार्कोवची दसरी लढाई.
- १९४२ - ज्यूंचे शिरकाण - ऑश्वित्झ कॉॅंसेन्ट्रेशन कॅम्पमध्ये १,५०० ज्यू व्यक्तिंना विषारी वायूने मारण्यात आले.
- १९४९ - शीत युद्ध - सोवियेत संघाने बर्लिनचा वेढा उठवला.
- १९४९ : सयामचे नाव बदलून थायलंड करण्यात आले.
- १९५२ - प्रजासत्ताक भारताचे पहिले संसदीय अधिवेशन सुरू.
- १९५२ - गजसिंग जोधपुरच्या राजेपदी.
- १९५५: दुसरे महायुद्ध – संपल्यावर ऑस्ट्रियाने दोस्त राष्ट्रांकडून स्वातंत्र्य मिळवले.
- १९५८ - अमेरिका व कॅनडाने शत्रूपासून एकमेकांचे रक्षण करण्याचा तह केला.
- १९६५ - सोवियेत संघाचे चांद्रयान लुना ५ चंद्रावर कोसळले.
- १९७५ - कंबोडियाच्या आरमाराने अमेरिकेचे एस.एस. मायाग्वेझ हे जहाज पकडले.
- १९७८ - झैरमध्ये अतिरेक्यांनी कोल्वेझी शहर जिंकले.
- १९८७: ब्रिटिश रॉयल नेव्ही मधील एचएमएस हार्मिस ही युद्धनौका विकत घेऊन भारताने तीला आयएनएस विराट या नावाने दाखल केले.
- १९९८: केन्द्र सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून वरून ६० वर्षे करण्याचा केन्द्र सरकारचा निर्णय.
- १९९८: भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांना बिर्ला अॅकॅडमी ऑफ आर्ट अँड कल्चर या संस्थेचा जी. डी. बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर
एकविसावे शतक
- २००३ - सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये अल कायदाने बॉम्बस्फोट घडवले. २६ ठार.
- २००८: चीनमध्ये ८.० पेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपात ६९,००० पेक्षा जास्त लोक मारले गेले.
- २०१०: एस. एच. कपाडीया यांनी भारताचे ३८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
जन्म
- १४०१ - शोको, जपानी सम्राट.
- १४९६ - गुस्ताव पहिला, स्वीडनचा राजा.
- १६७० - फ्रेडरिक ऑगस्टस पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १८२० - फ्लोरेंस नाइटिंगेल, आधुनिक शुश्रुषाशास्त्राच्या संस्थापिका; ब्रिटिश परिचारिका.
- १८६७ - ह्यू ट्रंबल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८८७- आठवणीकार सदाशिव विनायक बापट
- १८८९ - ऑट्टो फ्रॅंक, जर्मन लेखक.
- १८९५: भारतीय तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती
- १८९९ -लाटव्हियाच्या योगशिक्षिका ईंद्रा देवी, भारतीय योगी.
- १९०५: कृतिशील विचारवंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक आत्माराम रावजी भट.
- १९०७ - कॅथेरिन हेपबर्न, अमेरिकन अभिनेत्री.
- १९०७: विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक, त्यांचे रामराज्य (१९४३), बैजू बावरा (१९५२), गूंज उठी शहनाई (१९५९), हिमालय की गोद में (१९६५) हे चित्रपट खूप गाजले. ’फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया’ या संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते.
- १९२५ - योगी बेरा, अमेरिकन बेसबॉलपटू.
- १९३० - तारा वनारसे, मराठी-इंग्लिश डॉक्टर, लेखिका.
- १९३३ - नंदकुमार महादेव नाटेकर उर्फ नंदू नाटेकर, अग्रगण्य भारतीय बॅडमिंटनपटू.
- १९६२ - एमिलियो एस्तेवेझ, अमेरिकन अभिनेता.
- १९६६ - स्टीवन बाल्डविन, अमेरिकन अभिनेता.
- १९७८ - थॉमस ओडोयो, केन्याचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १००३ - पोप सिल्व्हेस्टर दुसरा.
- १०१२ - पोप सर्जियस चौथा.
- १८८९ - जॉन कॅडबरी, इंग्लिश उद्योगपती.
- २०१० - तारा वनारसे, मराठी-इंग्लिश डॉक्टर, लेखिका.
- १९७०: नोबेल पुरस्कार विजेते जर्मन कवी आणि नाटककार नोली सॅच
- २०१४: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक सरत पुजारी
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर मे १२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)