मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
ब्रीदवाक्य | Mens et Manus |
---|---|
Endowment | ९९८ कोटी डॉलर्स |
President | सुजन हॉकफिल्ड |
पदवी | ४,१७२ |
स्नातकोत्तर | ६,०४८ |
Campus | १६८ एकर |
मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील एक खाजगी संशोधन विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ बॉस्टन महानगराच्या केंब्रिज शहरात असून येथे एकूण १०,३८४ विद्यार्थी शिक्षण घेतात. एम.आय.टी. ह्या संक्षिप्त नावाने जगप्रसिद्ध असलेल्या ह्या विद्यापीठाची स्थापना १८६१ साली झाली. अनेक अहवालांनुसार एम.आय.टी. ही अमेरिकेतील व जगातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था मानली गेली आहे.