Jump to content

मॅट डेमन

मॅट डेमन
जन्म ८ ऑक्टोबर, १९७० (1970-10-08) (वय: ५३)
केंब्रिज, मॅसेच्युसेट्स
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९८८ - चालू

मॅथ्यू पेज डेमन (Matthew Paige Damon; ८ ऑक्टोबर १९७०) हा एक अमेरिकन सिने अभिनेता, निर्माता व कथाकार आहे. डेमनला आजवर एक ऑस्कर पुरस्कार व दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आहेत. डेमन हॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. १९८८ सालापासून चित्रपटांमध्ये भूमिका करत असलेला डेमन १९९७ सालच्या गुडविल हंटिंग ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी प्रसिद्धीझोतात आला. ह्या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्तम पटकथाकाराचा ऑस्कर पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर सेव्हिंग प्रायव्हेट रायन, ओशन्स इलेव्हन, द डिपार्टेड इत्यादी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये तो चमकला. तसेच २००२ पासून चालू असलेल्या बॉर्न ह्या चित्रपट शृंखलेमधील जेसन बॉर्न ह्या प्रमुख पात्राच्या भूमिकेत डेमन झळकत आहे.

२०१५ साली प्रदर्शित झालेल्या द मार्शियन साठी डेमनला सर्वोत्तम अभिनेत्याचे ऑस्कर नामांकन मिळाले होते.

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील मॅट डेमन चे पान (इंग्लिश मजकूर)