मृदुला बेळे
प्रा. डॉ. मृदुला हेमंत बेळे या औषधनिर्माणशास्त्राच्या शास्त्रज्ञ आहेत.
जून २००५पासून, नाशिकच्या एन.डी.एम.व्ही.पी. फार्मसी महाविद्यालयात औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
शिक्षण
डॉ.मृदुला बेळे यांनी औषधनिर्माणशास्त्रामध्ये पीएच.डी. संपादन केली आहे.
त्यांनी हैद्राबादच्या नाल्सार विद्यापीठातून, इंटरनॅशनल पेटंट कायद्याच्या पदव्युत्तर पदविकेचे शिक्षण घेतले आहे.[१] त्या परीक्षेत त्या गुणानुक्रमे तिसऱ्या आल्या होत्या.
एल.एल.बी, पुणे विद्यापीठ
त्यांनी २०१३ साली तुरीन (इटली) येथे एल.एल.एम पदवीचे शिक्षण घेतले.
जपानी पेटंट कायद्याविषयी तोक्यो येथे विशेष प्रशिक्षण संपादन केले आहे.[१]
कार्य
- मृदुला बेळे यांनी ११हून अधिक संशोधनपर लेख लिहिले असून त्यांच्या नावावर किमान ३ पेटंटे आहेत.
- मराठी वृत्तपत्रांत त्या सातत्याने तांत्रिक विषयांवर ललित लिखाण करत असतात.
- त्यांची विविध ठिकाणी औ़़षधनिर्मिती, स्वामित्वाधिकार आदी विषयांवर व्याख्याने होत असतात. ३१ जानेवारी २०१४ रोजी, मुलुंड (मुंबई)मधील 'महाराष्ट्र सेवा संघा'त, 'औषधांचे अर्थकारण' या विषयावर त्यांचे असेच एक व्याख्यान झाले होते.
- पारंपरिक आणि नव्या औषधांच्या आणि प्रसाधनांच्या फोर्म्युलांच्या विविध प्रकल्पांमध्ये सल्लागार म्हणून कार्य केले आहे.
- रसायने आणि औषधांच्या क्षेत्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सल्लागार म्हणून कार्य केले आहे.[१]
लेखन
०१) 'कथा अकलेच्या कायद्याची' [१] (राजहंस प्रकाशन). या पुस्तकात बौद्धिक संपदा, हक्क, पेटंट, कॉपीराईट अशा विषयांची उकल केलेली आहे.
या पुस्तकाला मिलिंद संगोराम पुरस्कार मिळाला आहे.
०२) Pharmaceutics हे बेळे यांनी लिहिलेले एक इंग्रजी पुस्तक आहे.
०३) अशीही एक झुंज (सिप्ला या भारतीय औषध कंपनीने मानवतेसाठी दिलेली झुंज), राजहंस प्रकाशन
०४) कोरोनाच्या कृष्णछायेत, राजहंस प्रकाशन
०५) इसेन्शियल्स ऑफ फार्मास्युटिकल इंजिनीरिंग
०६) औषधनिर्माणशास्त्र विषयक तीन क्रमिक पुस्तके
०७) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन-पत्रिकांमध्ये अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
मृदुला बेळे यांचे ’पेटंट कायद्या’विषयी वृत्तपत्रांत आलेले लेख
- असून अडचण नसून खोळंबा ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २३-७-२०१५.
- आहे खडतर तरी... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २२-१०-२०१५.
- उत्क्रांतीच... सजीवांवरील पेटंटची! ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २०-८-२०१५.
- औषध न लगे मजला ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २६-३-२०१५.
- औषधांचे पेटंट युद्ध ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ३०-११-२०१४.
- कथा अकलेच्या कायद्याची .. -मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १६-७-२०१५.
- कलाकाराचा अधिकार -- कॉपीराइट ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २८-५-२०१५
- कलाकृतीच्या नैतिक हक्काचा प्रश्न .. - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १५-१-२०१५
- कलेसाठी की व्यापारासाठी? - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २१-५-२०१५
- कल्पना खुशाल चोरू द्या... - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ४-६-२०१५
- कळा औषधजन्माच्या.. - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ८-१०-२०१५
- का रे भुललासी? -- मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ३-९-२०१५
- कुऱ्हाडीचा दांडा.. - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ३०-४-२०१५.
- क्या नया है वह? - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ६-८-२०१५.
- ..गोफ विणू! ... - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २७-८-२०१५
- जाता जाता ... - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ३१-१२-२०१५ (लेखमालेतील शेवटचा लेख)
- ट्रिप्स करार की गळचेपी? ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २९-१-२०१५.
- ट्रिप्स करारावरचा उःशाप... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १२-२-२०१५.
- ट्रेडमार्क (आत्म)हत्या ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ५-३-२०१५.
- ट्रेडमार्क कसा असावा ...नसावा. ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २०-२-२०१५.
- ट्रेडमार्क.. नियमच नाबाद! .. मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १९-३-२०१५.
- तरुण आहे ’हक्क’ अजुनी...! ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २९-१०-२०१५.
- तुझं माझं जमेना.. मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १९-११-२०१५.
- तू गिर, मैं संभालूंगा ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १७-१२-२०१५.
- तिमिरातुनी तेजाकडे! ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १-१०-२०१५.
- तोल सांभाळण्याचा खेळ .. - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २२-१-२०१५
- धरलं तर चावतं.. मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ५-११-२०१५.
- (पुन्हा) प्रिय आजीस.. मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १०-१२-२०१५.
- प्रिय आजीस... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ३-१२-२०१५.
- फक्त ’कलाकार’ म्हणा ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २-७-२०१५.
- फेअर अँड एज्युकेटेड.. - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १८-६-२०१५.
- बासमतीचा पेटंटचा वाद... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १६-४-२०१५.
- बासमतीच्या पेटंटची लढाई जिंकली ...मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २३-४-२०१५.
- बुजगावण्याचा बागुलबुवा.. मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १५-१०-२०१५.
- बुजगावण्याला जेव्हा जाग येते.. मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १२-११-२०१५.
- बुडणार की तरणार?... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २६-११-२०१५.
- बौद्धिक संपदा धोरण कोणाच्या फायद्याचे? . मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २२-५-२०१६
- बौद्धिक संपदेला स्थानिक आधार ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ८-१-२०१५.
- ब्रॅंडनेम, ट्रेडमार्कचा ‘धुव्वा’! ... - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १२-३-२०१५
- ’ब्रॅण्डनेम’मधली बौद्धिक संपदा .. - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १९-२-२०१५
- मुझको भी तू ’लिफ्ट’ करा दे... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ९-७--२०१५.
- राजकन्या की चेटकीण? ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १०-९--२०१५.
- श्श्शूऽऽऽ... कुठं बोलायचं नाही ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २४-१२-२०१५.
- सख्खे शेजारी ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २५-६-२०१५.
- ‘संपुष्टी’तत्त्व आपल्या फायद्याचे!.. - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ५-२-२०१५
- सम थिंग्ज आर फेअर .. - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ११-६-२०१५.
- सैल सदऱ्याची गोष्ट - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १८-९-२०१६.
- स्थानमाहात्म्य! .... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २-४-२०१५.
- ही शर्यत रे अपुली..! .. - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १३-८-२०१५.
- ज्ञानफळांच्या राखणीसाठी... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १-१-२०१५.
- २०१५ सालामधील लोकसत्ता या दैनिकामधील 'कथा अकलेच्या कायद्याची' हे सर्वाधिक लोकप्रिय झालेले सदर होते.[१]
पुरस्कार
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे वार्षिक पुरस्कार, मे २०१८ [२]
बाह्य दुवे
डॉ.मृदुला बेळे यांचा इंग्रजी भाषेत परिचय
संदर्भ
- ^ a b c d e डॉ.मृदुला बेळे (२०१७). कथा अकलेच्या कायद्याची. पुणे: राजहंस प्रकाशन. ISBN 978-93-86628-05-3.
- ^ "महाराष्ट्र टाइम्स". १८ मे २०१८.