Jump to content

मृत्युञ्जयमंत्र

त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।उर्वारुकमिव बन्धनात् ।मृत्योर्मुक्षिय मामृतात्।

यज्ञातील आहुतींनी सुगन्धित झालेला (सुगन्धिम्) तसेच आरोग्य व समृद्धी वाढवणारा (पुष्टिवर्धनम्) जो त्रिनेत्र (त्र्यम्बकं) रुद्र, त्याच्यासाठी आम्ही यज्ञ करीत आहोत.( यजामहे) एखादी काकडी (उर्वारुकम्) जशी देठापासून सहज तोडावी तसे तू आम्हाला मृत्यूच्या बन्धनातून (मृत्यो:) सोडव पण अमृतत्त्वापासून (अमृतत्त्वात्) मात्र आम्हाला वेगळे करू नको.( मा)