मूर्तिदेवी पुरस्कार
'भारतीय ज्ञानपीठ' या संस्थेतर्फे दिला जाणारा पुरस्कार. ज्या ग्रंथात भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृती या गोष्टींवर भर दिला असेल अशा एखाद्या ग्रंथाच्या लेखकाला भारतीय ज्ञानपीठाकडून मूर्तिदेवी पुरस्कार दिला जातो. हा वार्षिक पुरस्कार अतिशय प्रतिष्ठेचा समजला जातो. पुरस्काराचे स्वरूप ४ लाख रुपये रोख, सन्मानपत्र, शाल, आणि सरस्वतीची देवीची मूर्ती असे असते.
हा पुरस्कार मिळालेले साहित्यिक
- कन्नड लेखक सी.के नागराज राव (१९८३)
- हिदी लेखक वीरेंद्र कुमार सखलेचा (१९८४)
- गुजराती लेखक मनुभाई पंचोली ‘दर्शक' (१९८५)
- राजस्थानी लेखक कन्हैया लाल सेथिआ (१९८६)
- हिंदी लेखक विष्णू प्रभाकर (१९८८)
- हिंदी लेखक विद्या निवास मिश्र (१९८९)
- हिंदी लेखक मुनि श्री नागराज (१९९०)
- मल्याळी लेखक डॉ प्रतिभा राय (१९९१)
- हिंदी लेखक कुबेरनाथ राय (१९९२)
- हिंदी लेखक श्यामाचरण दुबे (१९९३)
- मराठी लेखक शिवाजी सावंत (१९९४)
- हिंदी लेखक निर्मल वर्मा (१९९५)
- हिंदी लेखक गोविन्दचंद्र पांडेय (२०००)
- हिंदी लेखक राममूर्ति त्रिपाठी (२००१)
- हिंदी लेखक यशदेव शल्य (२००२)
- हिंदी लेखक कल्याणमल लोढा (२००३)
- गुजराती लेखक नारायण देसाई (२००४)
- हिंदी लेखक डॉ. राममूर्ति शर्मा (२००५)
- हिंदी लेखक कृष्णबिहारी मिश्र (२००६)
- कन्नड लेखक वीरप्पा मोईली (२००७)
- हिंदी लेखक गुलाब कोठारी (२०११)
- उडिया लेखक हरप्रसाद दास (२०१२)
- मल्याळी लेखक सी. राधाकृष्णन (२०१३)
- हिंदी लेखक डॉ. विश्वनाथ त्रिपाठी (२०१४)
मूर्तिदेवी पुरस्कारविजेती पुस्तके आणि त्यांचे लेखक
- कल्पतरु की उत्सव लीला (कृष्णबिहारी मिश्र)
- कामधेनु (कुबेरनाथ राय)
- तिक्कडल कतान्हू तिरूमधुरम (सी राधाकृष्णन)
- भारत और यूरोप प्रतिश्रुति के क्षेत्र (निर्मल वर्मा)
- भारतीय दर्शन की चिंतनधारा (डॉ राममूर्ति शर्मा)
- मारू जीवन आज मारी वाणी (नारायण देसाई)
- मृत्युंजय - लेखक : शिवाजी सावंत
- मैं ही राधा मैं ही कृष्ण (गुलाब कोठारी)
- यज्ञसेनी (डॉ प्रतिभा राय)
- श्री रामायण महानिवेशणम (वीरप्पा मोईली)
- वमसा (हरप्रसाद दास)
- व्योमकेश दरवेश - लेखक : डॉ.विश्वनाथ त्रिपाठी