मुहर्रक
मुहर्रक المحرق | ||
बहरैनमधील शहर | ||
| ||
मुहर्रक | ||
देश | बहरैन | |
लोकसंख्या (२०११) | ||
- शहर | १,७६,५८३ | |
प्रमाणवेळ | यूटीसी+०३:०० |
मुहर्रक (अरबी: المحرق) हे पश्चिम आशियामधील बहरैन देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. मुहर्रक शहर मुहर्रक ह्याच नावाच्या बेटावर इराणच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसले आहे. १९२१ सालापर्यंत बहरैनची राजधानी जवळील मुहर्रक येथेच स्थित होती. विसाव्या शतकामध्ये खनिज तेल विक्रीमुळे बहरैनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली व मनामा हे देशाचे आर्थिक व वाणिज्य केंद्र बनले. ह्याकारणास्तव १९२१ साली राजधानी मनामाला हलवण्यात आली.
वाहतूक
गल्फ एअरचा प्रमुख वाहतूकतळ असलेला बहरैन आंतरराष्ट्रीय विमानतळ मुहर्रक येथेच स्थित आहे.
बाह्य दुवे
- विकिव्हॉयेज वरील मुहर्रक पर्यटन गाईड (इंग्रजी)