मुस्तफा खान
मुस्तफा खान हा विजापूरच्या आदिलशहाचा वजीर होता. तो एक अत्यंत कर्तबगार, शूर, आणि मुत्सद्दी पुरुष होता त्याचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो शहाजीराजे भोसले यांचा कट्टर वैरी होता. शहाजीराजांचे निजामशाही उभी करण्याचे राजकारण यानेच हाणून पाडले आणि शहाजी राजांना कैदही त्यानेच केले. ९ नोव्हेंबर, इ.स. १६४८ रोजी त्याचा मृत्यू झाला