मुश्ताक मोहम्मद
मुश्ताक मोहम्मद (२२ नोव्हेंबर, १९४३:जुनागढ, जुनागड संस्थान - ११ ऑगस्ट, २०१६) हा पाकिस्तानकडून १९५९ ते १९७९ दरम्यान ५७ कसोटी आणि १० एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
हा उजव्या हाताने फलंदाजी व लेग-ब्रेक गोलंदाजी करीत असे.
याचे तीन भाऊ वझीर मोहम्मद, हनीफ मोहम्मद आणि सादिक मोहम्मद पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. अजून एक भाऊ रईस मोहम्मद प्रथमवर्गीय क्रिकेट खेळाडू होता.
![]() |
---|
![]() |