मुल्हेर
मुल्हेर | |
मुल्हेरचा किल्ला | |
नाव | मुल्हेर |
उंची | 4290 फूट |
प्रकार | गिरीदुर्ग |
चढाईची श्रेणी | माध्यम |
ठिकाण | नाशिक, महाराष्ट्र |
जवळचे गाव | मुल्हेरवाडी |
डोंगररांग | सेलबरी-डोलबारी |
सध्याची अवस्था | ठीक |
स्थापना | {{{स्थापना}}} |
मुल्हेर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
भौगोलिक स्थान
मुल्हेर हा किल्ला डोलबरी पर्वत रंगांमध्ये किल्ल्याची अंदाजे समुद्रसपाटीपासून उंची ४२९० फूट आहे. मुल्हेरला जोडूनच मोरागड असून तो मुल्हेर किल्ल्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखतात. साल्हेर वाडी कडून जवळपास 22 किमी अंतर असून ताहाराबाद पासून 15 किमी अंतर आहे.
कसे जाल ?
मुल्हेर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा अस्तित्वात आहेत. या दोन्ही वाटा मुल्हेर गावातूनच जातात. मुल्हेर गाव ते किल्ल्याचा पायथा यात २ कि.मीचे अंतर आहे. गावातून २५ मिनिटे चालत पुढे आल्यावर डावीकडे एक घर लागते. आणि समोरच वडाचे एक झाड दिसते. झाडापासून सरळ पुढे जावे. दहा मिनिटांतच धनगरवाडी लागते. धनगरवाडी वरून जाणारी वाट पकडावी. साधारण ४५ मिनिटांनी २ वाटा फुटतात. एक वाट सरळ तर दुसरी उजवीकडे वळते.
सरळ वाट : सरळ जाणाऱ्या वाटेने २० मिनिटांत मुल्हेर माचीवरील गणेश मंदिरापाशी पोहचतो. या वाटेने गडावर प्रवेश करताना ३ दरवाजे लागतात. ते सर्व ढासळलेल्या अवस्थेत आहेत. वाट साधी व सोपी आहे. या वाटेने गडावर पोहोचण्यास दीड तास पुरतो
उजवीकडची वाट : उजवीकडच्या वाटेने गेल्यावर दोन तासांनी आपण मुल्हेरमाची वरील गणेश मंदिरात पोहचतो. या वाटेनेही गडावर प्रवेश करताना ३ दरवाजे लागतात. ही वाट जरा दूरची आहे. ही वाट हरगड व मुल्हेर किल्ला यांच्या खिंडीतून वर चढते. या खिंडीतून डावीकडे मुल्हेर तर उजवीकडे हरगड लागतो. या वाटेने गडावर पोहचण्यास ३ तास लागतात.
इतिहास
छत्रपती शिवाजी महाराजांचा पेशवा मोरोपंत ह्यानी हा किल्ला सन १६७२ साली जिंकुन घेतला. मुघलांसाठी हा मोठा धक्का होता. सन १८१८ च्या शेवटच्या इंग्रज मराठा युद्धानंतर ह्या किल्ल्यावर चार मोठ्या तोफा असल्याचे काही उल्लेख सापडतात. फत्तेलश्कर, रामप्रसाद, शिवप्रसाद व मार्कंडेय अशी त्यांची नावे होती. त्यातील शेवटची तोफ इंग्रजांनी वितळवल्याचे कळते, तीन तोफांपैकी २ तोफा रामप्रसाद व शिवप्रसाद हे २०२१-२०२२ मध्ये जंगलात शोधमोहिमेत सापडल्या होत्या दिनांक ६ मार्च २०२२ रोजी पुरातत्त्व खाते नाशिक विभागाची परवानगी घेऊन सदर तोफा सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत १२ तासात मुल्हेर गडावर पोहच केल्या
शेवटच्या युद्धानंतर महाराष्ट्रातील इतर बऱ्याच किल्ल्यांप्रमाणे हा किल्लाही बेवारस अवस्थेतच आहे. त्याच्या शेजारचे दोन किल्ले मोरा व हरगडही त्याच स्थितीत आहेत. वर जायच्या वाटा बंद झाल्यामुळे हरगडावर जाणेही अवघड झाले आहे.ह्या गडावर निसर्गरम्य वातावरणाचा लाभ मिळतो.
छायाचित्रे.
मोरागड वर विस्तीर्ण पठार असून त्याला हवी तर माची म्हणू शकता. तसेच मोरागड वर पाण्याच्या टाक्या देखील आहेत.मुल्हेर किल्ल्यावर एकएक ग्राम दैवतसर्डवरील पाहण्यासारखी ठिकाणे
गडावरील राहायची सोय
गडावरील खाण्याची सोय
गडावरील पाण्याची सोय
गडावर जाण्याच्या वाटा
मार्ग
जाण्यासाठी लागणारा वेळ
हे सुद्धा पहा
- सांगाती सह्याद्रीचा
- डोंगरयात्रा
- भारतातील किल्ले