Jump to content

मुलुंड रेल्वे स्थानक

मुलुंड हे मुंबई शहराचे एक उपनगर आहे व मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. हे उपनगर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून अहे. पूर्व द्रुतगति मार्ग व लालबहादुर शास्त्री मार्ग असे महत्तवपूर्ण मार्ग सुद्धा मुलुंडमध्ये आहेत. मुलुंडपासून नवी मुंबई पण मुलुंड-ऐरोली पुलामुळे जवळ पडते. या सर्वाव्यतिरिक्त सुद्धा येथून बोरिवली सारखे मुंबईच्या व्यायव्य उपनगर घोडबंदर मार्ग वापरून पोहोचणे शक्य आहेत. वांद्रे, ज्याला उपनगरांची राणी म्हणतात, तसेच मुलुंडला पण 'उपनगरांचा राजकुमार' असे म्हणले जाते.

पुर्वी मुलूंडचे नाव मुळूंद होते, नंतर अपभ्रंशाने किंवा अंग्लेय अधिपत्यामुळे ते मुलूंड म्हणून प्रचलित झाले.[ संदर्भ हवा ] मुलुंड हे मुंबईचे उपनगर आहे. इ.स.पू.च्या नवव्या शतकातील अशोककालीन बौद्ध शिलालेखात मुलुंडचा उल्लेख आहे.

मुलुंड
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
नाहूर
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्यउत्तरेकडचे पुढचे स्थानक:
ठाणे
स्थानक क्रमांक: १८ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ३१ कि.मी.