मुलापल्ली रामचंद्रन
मुलापल्ली रामचंद्रन (नोव्हेंबर ७, इ.स. १९४४- हयात) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. १९८४, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील कण्णुर लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील वडकारा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.