मुर्तिजापूर
?मुर्तिजापूर महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची | • ३०८ मी |
जिल्हा | अकोला |
लोकसंख्या | ३८,५५१ (२००१) |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • ४४४१०७ • +०७२५६ • MH-३० |
मुर्तिजापूर हे महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील शहर व नगरपालिका क्षेत्र आहे. हे अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्याचे मुख्यालय आहे.
मुर्तिजापूर शहर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर अकोला शहरापासून ४५ कि. मी. अंतरावर आणि अमरावती शहरापासून ६० कि. मी. अंतरावर आहे. अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांना जोडणारे हे महत्त्वाचे शहर असून रेल्वेचे जंकशन आहे. भारतातील जुन्या रेल्वेपैकी एक शकुंतला गाडी यवतमाळ आणि मुर्तिजापूर या शहरांना जोडते तर अचलपूर आणि मुर्तिजापूर या शहरांना जोडणारी एक गाडी आहे. तसेच मुंबई ते कोलकाता अशी पूर्व पश्चिम भारतास जोडणारी अत्यंत महत्त्वाची रेल्वेही मुर्तिजापूरहून जाते.
मुर्तिजापूर शहर हे संत गाडगेबाबा आणि संत पुंडलिक महाराज यांची भूमी म्हणूनही प्रसिद्ध आहे.