मुरबाड विधानसभा मतदारसंघ
मुरबाड विधानसभा मतदारसंघ - १३९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मुरबाड मतदारसंघात ठाणे जिल्ह्यातील १. मुरबाड तालुका, २. कल्याण तालुक्यातील टिटवाळा आणि नाडगांव महसूल मंडळ, ३. अंबरनाथ तालुक्यातील गोरेगांव, बदलापूर ही महसूल मंडळे आणि कुळगांव बदलापूर नगरपालिका, अंबरनाथ महसूल मंडळ (भाग) मांजली सझा, खरवई सझा यांचा समावेश होतो. मुरबाड हा विधानसभा मतदारसंघ भिवंडी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे किसन शंकर कथोरे हे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
मुरबाड मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | किसन शंकर कथोरे | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | किसन शंकर कथोरे | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | किसन शंकर कथोरे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
मुरबाड | ||
उमेदवार | पक्ष | मत |
किसन शंकर कथोरे | राष्ट्रवादी | ५५८३० |
पवार गोटीराम पदू | अपक्ष | ४९२८८ |
वामन बारकू म्हात्रे | मनसे | ३७०८० |
दिगंबर नारायण विषे | भाजप | २५२५८ |
राजरत्न अशोक आंबेडकर | अपक्ष | ४६६६ |
शोभा शुद्धेदन इंगळे | बसपा | १८३७ |
पिसेकर विष्णू पांडुरंग | शेकाप | १३३६ |
अल्ताफ इमाम शेख | अपक्ष | १२६६ |
शरद लक्ष्मण भुंडेरे | शिपा | १००९ |
ब्रह्मा मुरलीधर धोत्रे | भाबम | ९५३ |
२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका
विजयी
संदर्भ
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मुरबाड विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.