मुरडशेंग
" | मुरडशेंग | ||||
---|---|---|---|---|
" | शास्त्रीय वर्गीकरण | ||||
| ||||
इतर नावे | ||||
|
मुरडशेंग तथा मुरुडशेंग (संस्कृत: आवर्तनी; हिंदी: मरोरफली; बंगाली: अल्मोरा; गुजराती: मरडाशिंगी; तामिळ: वलंबुरी; तेलगू: श्यामली; कन्नड: भूतकरळु; शास्त्रीय नाव: Helicteres isora कुळ (Family) - Sterculiaceae इंग्रजी नाव - East Indian Screw tree. हा एक झुडपासारखा लहान वृक्ष आहे. याची फुले लाल रंगाची दिखाऊ असतात.व ती पावसाळ्यात येतात. औषधांत मूळ व फळ वापरतात.
धर्म- मुळाची साल स्नेहन व जराशी ग्राही आहे.ही खत्मी नावाच्या युनानी औषधाबदली वापरता येते.
उपयोग- मुळाची साल मधुमेहात काढा करून देतात. शेंग थंड पाण्यात उगाळून मुलांस कानांच्या पाठीमागे खरूज होते तिजवर लेप करतात. आंतड्यांवर कार्य करणारी औषधे सूक्ष्म प्रमाणात द्यावयाची असतात तेव्हा त्याचे भाग करून देण्यासाठी मुरडशेंगेचे चूर्ण वापरल्यास सोईचे पडते.
संदर्भ- ओषधीसंग्रह (डॉ.वामन गणेश देसाई)