मुमताज अन्सारी
मुमताज अन्सारी ( सप्टेंबर २६,इ.स. १९४७) हे भारतीय राजकारणी आहेत.ते जनता दल पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील कोडर्मा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते.
ऑक्टोबर २००३ मध्ये अन्सारी गूढ रित्या गायब झाले. पोलीस तपासामध्ये काहीही निष्पन्न झाले नाही. अन्सारी ह्यांची हत्या करण्यात आली असल्याची भिती त्यांच्या परिवाराने व्यक्त केली.