Jump to content

मुद्रांक

मुद्रांक हा कायदेशीर दस्तऐवजांवर लावला जाणारा कर आहे. चेक, प्राप्ती, लष्करी कमिशन, विवाह परवाने, जमीन व्यवहार, इ. यांवर हा कर लावला जातो. कागदपत्र कायदेशीररित्या प्रभावी होण्यासाठी आणि स्टॅंप ड्युटी भरण्यात आली आहे असे दर्शविण्याकरता कागदपत्रावर एक स्टॅंप (महसूल स्टॅंप) लावण्यात येतो. कराच्या अधिक आधुनिक पद्धतींमध्ये आता प्रत्यक्ष स्टॅंपची लावण्याची आवश्यकता नसते. याचा उगम स्पेनमध्ये झाला असे म्हणले जाते, १९२० च्या दशकात नेदरलॅंड्समध्ये, फ्रान्स मध्ये १६५१, डेन्मार्क मध्ये १६५७ आणि इंग्लंड मध्ये १६९४ साली लागू करण्यात आला.