मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे. महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना ₹ १,५००/- असा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
पात्रता
- महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
- राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
- किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
- लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹ २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- अर्जदाराचे हमीपत्र
- अधिवास / जन्म प्रमाणपत्र
- उत्पन्न दाखला
अर्ज कोणाकडे जमा करावा?
- अंगणवाडी सेविका
- अंगणवाडी मदतनीस
- पर्यवेधिका
- ग्रामसेवक
- वॉर्ड अधिकारी
संदर्भ
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ[permanent dead link]