मुखेड विधानसभा मतदारसंघ
मुखेड विधानसभा मतदारसंघ - ९१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मुखेड मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील १. मुखेड तालुका आणि २. कंधार तालुक्यातील पेटवडज आणि कुरुळा ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. मुखेड हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे तुषार गोविंदराव राठोड हे मुखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | तुषार राठोड | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | गोविंदराव मुक्काजी राठोड | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | हणमंतराव सोळंके-पाटील | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
मुखेड | ||
उमेदवार | पक्ष | मत |
हनमंतराव वेंकटराव पाटील | काँग्रेस | ६६०१३ |
गोविंदराव मक्काजी राठोड | अपक्ष | ६४७९७ |
वसंत इरण्णा संबुटवाड | शिवसेना | १५५०८ |
दशरथ मंघाजी लोहबंदे | भाबम | ५२५२ |
विलास रामदास डांगे | अपक्ष | २११९ |
सुधाकर रामराव पांढरे | जसुश | १८९५ |
रहीम पठाण | अपक्ष | १३६१ |
लक्ष्मण इंगळे | बसपा | १२२९ |
गोविंदराव सखाराम सुरनर | रासप | ६७४ |
शिवराज खनकरे | अपक्ष | ६४२ |
उद्धव उमटे | अपक्ष | ४४७ |
बालाजी बळीराम बंडे | अपक्ष | ३९४ |
संदर्भ
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मुखेड विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.