मुखपृष्ठ/धूळपाटी1
सुस्वागतम् |
मासिक सदरहंपी किंवा हम्पे हे भारताच्या कर्नाटक राज्यातील पुरातन शहर आहे. मध्य कर्नाटकाच्या पूर्व भागात होस्पेट शहराजवळ असलेले हंपीचे अवशेष युनेस्कोचे भारतातील एक जागतिक वारसा स्थान आहे. अनेक इमारती व मंदिरांचे हे अवशेष ४,१०० हेक्टर (१६ चौ. मैल) विस्तारात पसरलेले आहेत. यांत दक्षिण भारतातील शेवटच्या महान हिंदू साम्राज्यातील १,६००हून अधिक किल्ले, तटबंद्या नदीकाठच्या इमारती, राजवाडे, मंदिरे, मंडप, स्मारके, जल संरचना, इत्यादीचा समावेश आहे. यांचे वर्णन युनेस्कोने कठोर आणि भव्य स्थान असे केले आहे. हंपी शहर मध्य कर्नाटकच्या पूर्व भागात तुंगभद्रा नदीच्या काठावर आंध्र प्रदेश राज्याच्या सीमेजवळ वसलेले आहे. ते बेंगलुरूपासून ३७६ किलोमीटर (२३४ मैल) आणि हुबळीपासून १६५ किलोमीटर (१०३ मैल) अंतरावर आहे. येथून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन होस्पेट, १३ किलोमीटर (८.१ मैल) अंतरावर आहे आणि सर्वात जवळचे विमानतळ तोरणागल्लू येथील जिंदाल विजयनगर विमानतळ, ३२ किलोमीटर (२० मैल) अंतरावर आहे. येथून बेंगलुरूला विमानसेवा उपलब्ध आहे. गोवा आणि बेंगलुरूहुन बस आणि रेल्वेने एका रात्रीत हंपीला पोहोचता येते. बदामी आणि ऐहोल पुरातत्त्व स्थळांच्या आग्नेयेस, हंपी १४० किलोमीटर (८७ मैल) अंतरावर आहे. येथून कोणताही महामार्ग जात नाही. दख्खनी सुलतानांच्या नंतर १८व्या शतकापर्यंत हंपी आणि आसपासचा प्रदेश स्थानिक सरदार, दरकदार, हैदराबादचा निझाम, मराठा साम्राज्य आणि त्यानंतर हैदरअली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान यांच्या ताब्यात येत-जात राहिला. १७९९मध्ये ब्रिटिश सैन्याने टिपू सुलतानचा पराभव केला आणि वडियार राजांना पुढे करीत या प्रदेशावर ताबा मिळवला. ब्रिटिश शासनांतर्गत भारताचे पहिले सर्वेक्षक जनरल स्कॉटिश कर्नल कॉलिन मॅकेन्झी यांनी १८०० मध्ये हंपीच्या अवशेषांचे सर्वेक्षण केले होते. मॅकेन्झीने लिहिले की हंपीच्या आसपासचा प्रदेश निर्मनुष्य आहे आणि तेथे फक्त जंगली प्राणी राहतात. मॅकेन्झी आणि त्यांचा कित्ता गिरविणाऱ्या लेखकांनी हंपीच्या विनाशाचे कारण हैदरअली आणि मराठा साम्राज्य असल्याचे ठरवून टाकले. १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत हंपी प्रदेश दुर्लक्षितच राहिला. अलेक्झांडर ग्रीनलॉ यांनी १८५६ मध्ये काढलेल्या छायाचित्रांनी याला थोडी प्रसिद्धी मिळाली. त्यांनी १८५६ मध्ये शाबूत असलेली मंदिरे, राजवाडे आणि इतर शाही वास्तूंच्या ६० कॅलोटाइप छायाचित्रांचे संग्रहण तयार केले. ही छायाचित्रे युनायटेड किंग्डममधील एका खाजगी संग्रहात ठेवण्यात आली होती. ही छायाचित्रे १९८० पर्यंत प्रकाशित झाली नव्हती. विद्वानांसाठी ते १९व्या शतकाच्या मध्यावरील हंपी स्मारक राज्याचे सर्वात मौल्यवान स्रोत आहेत. मागील अंक: एप्रिल २०२३ - ऑगस्ट २०१९ - जून २०१९ - एप्रिल २०१९ - मार्च २०१९ - जानेवारी २०१९ - नोव्हेंबर २०१८ - मे २०१८ - मार्च २०१८ - महिला दिवस, २०१८ - २०१७ मधील सदर लेख - २०१६ मधील सदर लेख - २०१५ मधील सदर लेख - २०१४ मधील सदर लेख- २०१२ मधील सदर लेख - २०१२ मधील सदर लेख - २०११ मधील सदर लेख - २०१० मधील सदर लेख - २००९ मधील सदर लेख - २००८ मधील सदर लेख - मागील अंक |
|
निवेदनमराठी विकिपीडियाची प्रगती सातत्याने होत आहे. ही गती वाढविण्यासाठी आणि विकिपीडियातील मजकूर अधिक गुणवत्तेचा तसेच परिपूर्ण करण्यासाठी आपला सहयोग अतिमहत्त्वाचा आहे. यासाठी पुढील काही गोष्टी आपण करु शकता:
|