Jump to content

मुखपट्टी

कापडी मुखपट्टी

मुखपट्टी हे कोरोना प्रतिबंधक असे चेह-यावर वापरायचे साधन आहे. कोरोना रोगाचा प्रसार टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग (दोन व्यक्तीमध्ये कमीतकमी एक मीटरचे अंतर) आणि मुखपट्टी (चेहऱ्यावर नाक-तोंड झाकणारा मास्क) या गोष्टी आवश्यक केल्या आहेत.[] ह्या गोष्टी टाळणाऱ्या माणसाला आर्थिक दंडाची शिक्षा होऊ शकते.

मुखपट्टी (मास्क) म्हणजे नाक-तोंड झाकणारी एक कापडी पट्टी. ही नाकावरून घसरू नये म्हणून कानामागे अडकवण्यासाठी हिच्या दोन्ही टोकांना कापडी किंवा इलॅस्टिकच्या नाड्या असतात.

या कापडी पट्टीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता दुरावत असली, तरी संपूर्ण संरक्षण मिळत नाही. त्यासाठी चीन-कोरियातून आयात केलेल्या व काही खास मटेरियलपासून बनलेल्या पांढऱ्या शुभ्र शंक्वाकार मुखपट्ट्या वापरल्यास ९५ टक्केपर्यंत सुरक्षा मिळते. या मुखपट्ट्या चार प्रकारामंध्ये आहेत.

१). N95 : ही मुखपट्टी चेहऱ्याचे ०.३ मायक्राॅन आकारमानाच्या कणांपासून संरक्षण देते. पण फारच थोड्या लोकांनी वापरल्यामुळे हिचे उत्पादन कमी झाले, आणि ही मुखपट्टी मिळणे दुरापास्त झाले.

२). KN95 : चीनमध्ये बनलेली ही मुखपट्टी चेहऱ्यावर लावल्यास सहसा न पकडता येणारे ९५ टक्के कण गाळून शरीराला शुद्ध हवा पोहोचवते. परंतु ही मुखपट्टी तिच्या बाजूच्या नाड्यांच्या साहाय्याने चेहऱ्यावर बऱ्यापैकी घट्ट बसतेच असे नाही. अशि न बसल्यामुळे ही मुखपट्टी आणि कापडी पट्टी यांत फारसे अंतर राहिलेले नाही. शिवाय या प्रकारच्या मुखपट्टीसारख्या अनेक बनावट मुखपट्टया बाजारात आल्याने व जास्त लोकांनी न वापरल्यामुळे ही पट्टी मिळणे कठीण झाले आहे.

३). KF94 : दक्षिण कोरियामधे बनली असल्यास हिच्यासारखी परिणामकारक दुसरी मुखपट्टी नाही. ही हवेतले कण उत्तम प्रकारे गाळते आणि चेहऱ्याला फिट बसत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही लोकप्रिय आहे.

४). सर्जिकल मास्क : चौकोनी आकाराचा हा घड्याघड्यांचा (Pleated) मास्क कृत्रिम धाग्यांपासून बनलेला असतो. घड्या असल्यामुळे हा ताणून घातल्यावर चेहऱ्यावर घट्ट बसतो. हवेतले ६० ते ८० टक्के विषारी कण गाळण्याची याची क्षमता असते. परंतु हा मास्क आणि चेहरा यांच्यामध्ये पडणाऱ्या फटींमुळे ह्याची परिणामकता कमी झाली आहे. ह्यापेक्षा दुहेरी कापडपट्टया आणि मधे फिल्टर मटेरियलचा पातळ थर यांपासून बनलेली मुखपट्टी चांगली समजली जाते.

सी एसआय मुखपट्टी


संदर्भ

  1. ^ "Mask :कपड्याचा मास्क वापरत आहात, तर हे जरुर वाचा". 24taas.com. 2021-09-11. 2021-09-14 रोजी पाहिले.