मुक्त ज्ञानकोश
येथील लेखनाचा परिघ ज्ञानकोशाचा असतो.मुक्त ज्ञानकोश वाचन, लेखन, संपादन,सुधारणा, बदल करण्याकरीता सर्वांना मुक्त असतात.मुक्त ज्ञानकोशातील लेखात सर्वसामान्य वाचक सुद्धा लेखनात सहभाग घेतात तसेच एकट्याने अथवा सहयोगी पद्धतीने लेखन केले जाते.
मुक्त ज्ञानकोश हा मुक्त सॉफ्टवेअरच्या तत्त्वावर आधारित असून ज्ञानावरील मालकी हक्क असू नये म्हणून त्याची निर्मिती करण्यात आली आहे. विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश आहे. कोणीही वापरकर्ता तो संपादित करू शकतो.
विश्वकोश संकल्पना
विश्वकोशांना स्वतःचा विशिष्ट वाचकवर्ग असतो. तो केवळ विश्वासार्ह, संक्षिप्त (मोजके) साक्षेपी (संदर्भ असलेली काही विरुद्ध मते असल्यास, त्यांच्या सह) शक्य तिथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ आणि तटस्थपणे दिलेली माहिती वाचत असतो.
(इथे वाचकांना रुक्षता अपेक्षित नसते, पण निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टिकोण: आम्ही मोजकी तथ्ये आणि सांख्यकीय माहिती यांसह वाचतो. आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशिष्ट संदर्भासहित सांगा, पण आमचे मत प्रभावित करण्याकरिता तुमचे स्व:चे मत स्वतः त्यात मिसळू नका असा असतो.)
सारे विश्वकोश विश्वकोशाची विश्वासार्हता जपण्याकरिता सहसा वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात.त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा, इत्यादी ललीत लेखनाच्या किंवा ब्लॉग या स्वरूपातील लेखन टाळणे अपेक्षीत असते.
हे सुद्धा पहा
ललित लेखनाच्या स्वरूपातील किंवा ब्लॉग स्वरूपातील लेखन आपल्या आवडीचा किंवा सवयीचा भाग असेल तर, विकिपीडियात लिहिण्याच्या दृष्टीने, आपण आधी मराठी विकिपीडियात आधीपासून असलेल्या एखाद दुसऱ्या लेखांमध्ये भर घालून पाहू शकता, मुखपृष्ठ सदर म्हणून मागे निवडले गेलेले लेख अभ्यासू शकता अथवा धूळपाटी येथे कच्चे लेखन करून इतर संपादकांचे साहाय्य घेऊन ते बरोबर करून घेऊ शकता .
आपल्याला इतर नवागत सदस्य काय चुका करत असत्तात ते नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रूटी लेखात जाणून घेता येईल.आणि विकिपीडियाच्या इतर मर्यादांची माहिती विकिपीडिया:विकिपीडियाच्या मर्यादा या लेखात घेता येईल.
- पहा: नेहमीचे प्रश्न, विकिपीडिया:कारण,विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत