Jump to content

मुक्तागिरी

मुक्तागिरी हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील ठिकाण असून जैनधर्मीयांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. हे ठिकाण महाराष्ट्राच्या अमरावती पासून हे ६५ कि.मी. दूर आहे. हिरव्यागार डोंगराच्या कुशीत ५२ पांढरी शुभ्र संगमरवरी मंदिरे, धबधबा, गोमुखातून येणारे पाणी ही येथील वैशिष्ट्ये आहेत. डोंगरावर असलेल्या येथील मंदिरात जाण्यासाठी सहाशे पायऱ्यांचा प्रवास करावा लागतो. मंदिरात तीर्थंकर पार्श्वनाथांची मूर्ती आहे. जैन धर्मीयांच्या 'अतिशय क्षेत्रांपैकी' हे एक आहे.

बाह्य दुवे