Jump to content

मुंब्रा

मुंब्रा परिसर
मुंब्रा is located in मुंबई
मुंब्रा
मुंब्रा
मुंब्रा

ठाण्याच्या जवळ असलेले हे उपनगर मुंबईपासून ४० कि.मी. अंतरावर आहे.

मुंब्र्यात खाडी असल्याने मोगल काळात कल्याणच्या किल्ल्याची राखण करणारी चौकी म्हणून वसलेल्या या गावात सतराव्या शतकात जहाजबांधणीचा उद्योग भरभराटीस आला.आगरी-कोळी यांची देवता मुंब्रा देवीच्या नाववरून गावचे नाव मुंब्रा ठेवण्यात आले. मुंबा देवी देवीचे मंदिर मुंब्र्यातील डोंगराच्या शिखरावर आहे. मंदिराचे बांधकाम मुंब्रा येथील सुप्रसिद्ध भगत कुटुंबाने केले असून ते अजूनही शहरातच राहतात. १७ व्या शतकाच्या दरम्यान मुंब्रा हे आगरी-कोळीचे एक लहान गाव होते. त्यांचा मुख्य व्यवसाय हा मच्छिमारी होता. १९६८ ते १९७५ च्या दरम्यान नोकरीसाठी मुंबईला येणाऱ्यांची संख्या वाढू लागली व लोकांनी मुंबईच्या जवळ वसाहत स्थापन करायला सुरुवात केली. त्याच वेळी मुंब्र्याच्या शेतजमिनीचे शहरीकरण झाले व लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली. १९९१ ते १९९३ मध्ये होणाऱ्या मुंबईतील दंगली मुळे मुंबईतील मुस्लिम मुंबई सोडून मुंब्र्यात वसले. १९९१ मध्ये मुंब्र्याची लोकसंख्या ४४,००० होती आणि आज ती ९००,००० च्या जवळपास आहे.