Jump to content

मुंबई−अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस

मुंबई−अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेसचा फलक

मुंबई अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. शताब्दी एक्सप्रेस ह्या भारतामधील सर्वात वेगाने प्रवास करणाऱ्या व संपूर्ण वातानुकूलित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे मुंबई ते अहमदाबाद शहरांदरम्यान आठवड्यातून सहा दिवस धावते. पश्चिम रेल्वेमार्गे धावणाऱ्या मुंबई अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेसला मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक ते अहमदाबाद रेल्वे स्थानक दरम्यानचे ५९७ किमी अंतर पार करायला ६ तास व २० मिनिटे लागतात. मुंबई व अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या व केवळ खुर्चीयान असलेल्या एकूण ४ गाड्यांपैकी शताब्दी एक्सप्रेस ही एक असून गुजरात एक्सप्रेस, कर्णावती एक्सप्रेस व मुंबई अहमदाबाद डबल डेकर एक्सप्रेस ह्या इतर तीन गाड्या आहेत.

डब्यांची रचना

इतर शताब्दी एक्सप्रेस गाड्यांप्रमाणे मुंबई अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेसमध्ये फक्त आसनाची सोय असून शयनयान सेवा उपलब्ध केली जात नाही. साधारणपणे ८ वातानुकुलीत चेअर कार व २ एक्झेक्युटिव्ह कार ह्या गाडीमध्ये असतात. मुंबई अहमदाबाद मार्गाचे विद्युतीकरण झाले असल्यामुळे ह्या गाडीची वाहतूक विद्युत इंजिन वापरून केली जाते.

तपशील

वेळापत्रक

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१२००९मुंबई – अहमदाबाद०६:२५१२:४५रविवारखेरीज रोज
१२०१०अहमदाबाद – मुंबई१४:४०२१:२०रविवारखेरीज रोज

मार्ग

क्रम स्थानक संकेत स्थानक नाव अंतर (किमी)
BCT मुंबई सेंट्रल
BVI बोरिवली ३०
VAPI वापी१६८
ST सुरत२६३
BH भरूच३२२
BRC वडोदरा ३९३
ANND आणंद४२९
ND नडियाद४४७
ADI अहमदाबाद ४९३

बाह्य दुवे