Jump to content

मुंबईतील रस्त्यावरची खादाडी

मोहम्मद अली रोड वरील खाणे
मुंबईतील प्रसिद्ध वडा-पाव

मुंबईत फिरती दुकाने चालवून फेरीवाले आहार विक्री करतात तोच हा मुंबईतील रस्त्यावरील आहार आहे. या शहरातील हे एक विशेष असे नमुनेदार प्रकार आहे. रस्त्यावरील आहार हे या शहराचे एक वेगळेपण आहे. सामान्यतः सर्व भारतभर रस्त्यावर आहार मिळतोच पण मुंबईत सर्व प्रकारची जनता, त्यात गरीब, श्रीमंत, जातिभेद, या गोष्टी बाजूला ठेवून सर्वजण सकाळी, संध्याकाळी रस्त्यावरील आहाराचा आस्वाद घेतात आणि त्याची चव हॉटेलमधील आहारापेक्षा उत्कृष्ट आहे अशी अनुभवाने चर्चा करतात.[] अगणित मुंबईकराणा रात्रीच्या वेळी रस्त्यावरील आहार घेणे आवडते. मुंबईची जनता त्यावेळी सर्व अडथळे झुगारून जात, धर्म, लिंग, नैतिकता, राग, लोभ, विसरून रस्त्यावरील आहार घेण्यात मश्गुल असते. रस्त्यावरील आहार विक्रेत्यानी खरे तर ही व्यवस्था करून या शहरातील संस्कृतीत बदल घडवीण्यास हातभार लावलेला आहे. मुंबईतील हॉटेलशी तुलना केली तर रस्त्यावरील आहार कमी खर्चिक आहे आणि हे विक्रेते रेल्वे स्थानक, महाविध्यालय, अशा गर्दीच्या ठिकाणीच आहार देण्याची व्यवसाइक काळजी घेतात.

आहार प्रकार

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. येथे महाराष्ट्रीय आहाराचा प्रभाव आहे. वडा पाव हा येथील रस्त्यावरील अतिशय प्रसिद्ध आहार आहे.[] पाणीपुरी, भेलपुरी, सेवपुरी, दहिपुरी, सण्ड्विचेस, रगडा-प्याट्टीस, पावभाजी, चायनिज भेल, इडली, धोसा, या शाकाहारी पदार्थांचा ही यात समावेश आहे. जर का कुणाला मांसाहारी पदार्थ हवा असेल तर त्यांचेसाठी ओम्लेट पाव, कबाब, फिश, सुद्धा मिळते. या विविध प्रकारच्या आहाराने या शहरात समाजात विविधतेतून एकता आणलेली आहे ही विशेषतः आहे.

सन १९८० मध्ये याच मुंबईच्या रस्त्यावर चायनीज पदार्थ खाण्याकडे मने झुकलेली होती. यात पदार्थात आणखी एक पदार्थ म्हणजे मिसळ पाव! मिसळ म्हणजे कडधान्य वापरून पातळ आमटी (करी) केलेली असते. ती तिखट आणि तेलकट पण स्वादिष्ट चमचमीत असते व ही पाव आणि भारतीय ब्रेड बरोबर खातात. खावयास देताना त्या आमटीवर कच्ची कोथिंबीर, व बारीक चिरलेला कांदा टाकतात त्यांनी त्या आमटीला वेगळा सुगंध येतो.

कुल्फी (आइस क्रीम प्रकार), गोळा (आइस क्रीम कोन) म्हणजे जेवणानंतर मुखशुद्दी म्हणून थंड असे मुंबईच्या रस्त्यावरील खाण्याचे पदार्थ आहेत.[] अल्पोपआहारा शिवाय मुंबईच्या रस्त्यावर अनेक जूस मिळणारी केंद्रे आहेत व तेथे विविध प्रकारचे फळांचे जूस आणि मिल्कषेक मिळतात. त्याबरोबर मुंबईच्या रस्त्यावर ऊसाच्या ताज्या ताज्या रसाची स्वस्त आणि मस्त असी अनेक रसवंती ग्रह आहेत.[] चहा आणि लिंबू सरबत विक्रेत्यांची तर मुंबईभर साखळीच आहे. या विक्रेत्यांचा हरताळ कधीच नसतो त्यामुळे वर्षातील बारामहीने यांचा व्यवसाय चालू राहातो. भारतामध्ये जेवणानंतर मुख शुद्दी म्हणून पानविडा खातात.[] हा विडा बनऊन विकणारे कितीतरी विक्रेते मुंबईचे गल्लोगल्ली आहेत.

विभाग आणि विस्तार

साधारण लहानशा गल्लीत ही दुकाने असतात त्या गल्लीला “ खाऊ गल्ली ” म्हणतात त्याचा मराठी अर्थ उपहार मिळण्याचे ठिकाण! भेळ पुरी आणि कुल्फी साठी गिरगाव चौपाटी प्रसिद्ध आहे. या विक्रेत्यांचा मुंबईतील एक व्यापारी केंद्र असणाऱ्या नरीमन पॉइंट येथे लंच वेळेत फार जोरात व्यवसाय होतो.[]

मुंबईतील पंचतारांकित हॉटेलसह सर्व हॉटेल मधील किचन मध्ये आता हे रस्त्यावरील विविध आहार प्रकार बनवले जातात. जगातील सर्व हॉटेल मध्ये मुंबईच्या रस्त्यावर बनविल्या जाणाऱ्या पदार्थांची त्यांच्या मेनू कार्डावर वर्णी लागलेली आहे ही वस्तूस्थीती आहे. अलीकडे घरगुती तयार केलेले पदार्थ या विक्रेत्यांना देण्याची पद्द्त चालू झालेली आहे.

मतभेद

बरेच लोक विशेषतः उच्चभ्रू, शरीरस्वास्थ्यासाठी रस्त्यावरील पदार्थ खाणे टाळतात. रेस्टोरंट्स आणि हॉटेलनि याचे भांडवल केले आणि विक्रेत्या विरोधात जनतेला आवाहन केले. रस्त्यावर पदार्थ विकणारे विक्रेते हे उत्तर भारतीय आहेत. त्यांना सन २००८ मध्ये यांना बिगर महाराष्ट्रीयन संबोधून लक्ष्य केले आणि त्यांचेवर हल्ला केला होता. यातील खूप व्यावसायिक असे आहेत की अधिकाऱ्यांना लाच देऊन महानगरपालिकेचे लायसेन्स न घेता बेकायदेशीरपणे व्यवसाय करतात. जरी यांना पकडले आणि ताब्यात घेतलं तरी कांही वेळातच ते परत येतात. महानगरपालिका त्यांचे साहित्य आणि वस्तु त्यांचेकडून दंड घेऊन त्यांना परत करते. सन २००७ मध्ये सुप्रीम कोर्टाने या विक्रेत्यासाठी स्वतंत्र २३० विभाग निर्माण करा आणि त्यांना तेथे व्यवसाय करण्यासाठी जागा ध्या असा नियम तयार केला त्यानंतर ते विभाग १७०० पर्यन्त वाढविले पण अध्याप त्याची कार्यवाही झाली नाही. मागील २० वर्षात फिरत्या विक्रेत्याना लायसेन्स दिलेली नाहीत असा अहवाल प्रसिद्ध झाला त्यावेळी अंदाजित २५०००० विक्रेते होते त्यापैकि १७००० विक्रेते लायसेन्स धारक होते.

सन २०११ मध्ये ठाणे येथे एक पाणी पुरी विक्रेता जे भान्डे पाणी पुरी देण्यासाठी वापरतो त्या भांड्यात लघवी करतोय असे दुरदर्शनवर पाहीले आणि तेव्हा वादविवाद सुरू झाले. या घटनेने जनतेत हल्लकल्लोळ झाला आणि त्याला ठाणे शहरात राजकीय स्वरूप आले. शिव सैनिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीय पाणी पुरी व भेलपुरी विक्रेत्यावर मुंबई आणि ठाणे येथे हल्ला केला. पोलिसांनी त्या विक्रेत्याला पकडले आणि कौर्टात हजार केले. कोर्टाने त्याला दंड केला आणि जाणीव देऊन मुक्त केले. सर्व राजकीय पक्षांनी या पाणीपुरी विक्रेत्या विरोधात कारवाई केल्यानंतर जे मागील १५ वर्षापासून हा धंदा करत होते त्यांनी तो बंद केला आणि खाजगी कंपनी मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करू लागले.

संदर्भ

  1. ^ "मुंबईच्या रस्त्यावरील "स्ट्रीट फूड"ची चव चाखा".
  2. ^ "मुंबईच्या रस्त्यावरील "स्ट्रीट फूड"चा राजा - वडा पाव".
  3. ^ "चौपाटीवरील कुल्फीचा अमेरिका प्रवास".
  4. ^ "थंडगार उसाचा रस गरम उन्हाळ्यात परिपूर्ण उतारा आहे".
  5. ^ "पानविडा - मुख शुद्दी पदार्थ".
  6. ^ "स्ट्रीट फूड ते पंच तारांकित पदार्थ - चाटस".