Jump to content

मुंजा (भूत)


प्रचलित समजानुसार, भुताचा एक प्रकार. एखाद्या मुलाचा उपनयना नंतर आणि सोड मुंज होण्या पूर्वी मृत्यू झाल्यास (त्याची लग्न करण्याची इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे) तो 'मुंजा' होतो व पिंपळावर राहतो असा समज आहे.[ संदर्भ हवा ]

आपल्या सनातन धर्मा मध्ये सहा वर्ष्या खालील मुलाचे जर काही कारणास्तव निधन झाले तर त्याला दफन केले जाते कारण अशी मान्यता आहे कि, लहान मुलांना त्यांच्या शरीरशी मोह नसतो त्यांच्या तीव्र इच्छा नसतात, पण काही वेळेला लहान मुले लवकर समजूतदार होतात आणि त्यांचा काही इच्छा निर्माण होतात, यामध्ये त्यांचे मुंज झाले नसेल आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली नसेल तर त्यांच्या मृत्यू नन्तर त्यांची आत्मा मुंजा या प्रकारात मोडला जातो, मुंजा प्रकार प्रचंड शक्तिशाली असतो, कथा आणि तांत्रिक विधी करणारे साधक सांगतात कि मुंजा मंदिरा मध्ये जाऊन कोणतेही मंत्र उचरू शकतात त्यांच्या मध्ये इतकी शक्ती असते मुंजा पासून सुटका मिळवणे खूप अवघड असते, मुंजा पासून सुटका मिळवणे साठी खूपच कमी तांत्रिक विधी आहेत,