मीरा केसकर
डाॅ. मीरा केसकर ह्या एक वैचारिक लिखाण करणाऱ्या लेखिका आहेत. व्यवसायाने त्या होमिओपॅथिक डाॅक्टर आहेत. ३४हून अधिक वर्षे त्या नवी मुंबईत होमिओपॅथी आणि निसर्गोपचार केंद्र चालवीत आल्या आहेत. ज्योतिषशास्त्र, रेकी आणि पूर्वजन्मचिकित्सा या विषयांतही त्यांची गती आहे. त्यांचा उपयोग त्या रोग निदानासाठी करतात.
त्या भगवद्गीता, दासबोध, जे. कृष्णमूर्तीचे विचार यांसारख्या विषयांवर त्यांनी महाराष्ट्रात व्याख्याने देतात.
पुस्तके
- अनुत्तरित (बाललैंगिक शोषण या विषयावरचा ग्रंथ)
- एक पाऊल गीतेकडे (२००४)
- जे. कृष्णमूर्ती एक आनंदमेघ
- तो, ती आणि त्यांचे पिल्लू (कथासंग्रह, २०१०)
- निसर्गोपचार
- (वयाच्या आठव्या वर्षी अंधत्व आलेल्या) सदाशिवराव भिडे यांची जीवनगाथा
- सुखदुःख मीमांसा
पुरस्कार
- तो, ती आणि त्यांचे पिल्लू या पुस्तकाला