Jump to content

मीना वैशंपायन

डॉ. मीना वैशंपायन या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी संस्कृत आणि मराठी हे विषय घेऊन एम.ए. केले असून मराठी साहित्य हा विषय घेऊन पीएच.डी मिळवली आहे. त्यांनी चरित्रे, ललित, समीक्षा यांबरोबरच अनेक अनुवादही केले आहेत. वैशंपायन मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या मानद उपाध्यक्ष आहेत.

पुस्तके

  • अनित्य (अनुवादित; मूळ हिंदी कादंबरी - लेखिका – मृदुला गर्ग; संपादन - कविता महाजन),
  • मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या संग्रही असलेल्या हस्तलिखितांची माहिती देणारा सू‌चिग्रंथ (संकलक - डॉ. मीना वैशंपायन)
  • ज्ञानकोशकार डॉ. केतकर (चरित्र)
  • ‘ती’चं अवकाश - रूढी-परंपरांची चौकट मोडून स्वतःचं क्षितिज शोधणाऱ्या तीन पिढ्या (अनुवादित; मूळ इंग्रजी - ए स्पेस ऑफ हर ओन' , मूळ संपादक : लीला गुलाटी आणि जसोधरा बागची)
  • दुर्गापर्व (या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा समीक्षेसाठीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे.)
  • दुर्गा भागवत संच - दुर्गु आजीच्या गोष्टी (संपादित)
  • साहित्यवेध