Jump to content

मीना प्रभू

मीना प्रभू
जन्म ?
कार्यक्षेत्र वैद्यक, साहित्य
भाषामराठी
विषय प्रवासवर्णन

डॉ. मीना सुधाकर प्रभू (? - हयात) या एक डॉक्टर आणि मराठी लेखिका आहेत. त्यांचा जन्म आणि शिक्षण पुणे शहरात झाले. पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमधून त्यांनी एम.बी.बी.एस. केले. त्यानंतर मुंबईला जाऊन त्या डी.जी.ओ. झाल्या. १९६६ मध्ये लग्न झाल्यानंतर त्या इंग्लंडमध्ये आल्या. त्यांनी सुमारे वीस वर्षे लंडनमध्ये भूलतज्ज्ञ आणि जनरल प्रॅक्टिशनर म्हणून काम केले.

प्रभू यांनी जगातल्या अनेक देशांत प्रवास करून प्रवासवर्णने लिहिली आहेत. त्यांच्या आर्किटेक्ट पतीने यासाठी त्यांना उत्तेजन तर दिलेच, शिवाय पुरेसे आर्थिक पाठबळ दिले.[ संदर्भ हवा ] जेव्हा त्या प्रवास करीत नसतात, तेव्हा त्या लंडनमध्ये असतात.

प्रभू यांचे अनेक लेख मराठी वर्तमानपत्रांतून आणि नियतकालिकांमधून प्रकाशित झाले आहेत.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अपूर्वरंग (भाग १, २, ३, ४)प्रवासवर्णनपुरंदरे प्रकाशन
इजिप्तायनप्रवासवर्णनमौज प्रकाशन/पुरंदरे प्रकाशन२००५
उत्तरोत्तरप्रवासवर्णनपुरंदरे प्रकाशन२०१७
गाथा इराणीप्रवासवर्णनपुरंदरे प्रकाशन२००८
ग्रीकांजलीप्रवासवर्णनपुरंदरे प्रकाशन
चिनी मातीप्रवासवर्णनमौज प्रकाशन/पुरंदरे प्रकाशन२००३
डायना आणि चार्ल्सचरित्र?मेहता प्रकाशन
तुर्कनामाप्रवासवर्णनमौज प्रकाशन
दक्षिणरंगप्रवासवर्णनपुरंदरे प्रकाशन
न्यू यॉर्कप्रवासवर्णनपुरंदरे प्रकाशन२०१४
माझं लंडनप्रवासवर्णनमौज प्रकाशन/पुरंदरे प्रकाशन
मेक्सिकोपर्वप्रवासवर्णनमौज प्रकाशन२००१
रोमराज्य -१प्रवासवर्णनमौज प्रकाशन
रोमराज्य - २प्रवासवर्णनपुरंदरे प्रकाशन
वाट तिबेटचीप्रवासवर्णनपुरंदरे प्रकाशन
सुखनिधी तुझा माझाकाव्यपद्मगंधा प्रकाशन