Jump to content

मीना देशपांडे


मीना देशपांडे या आचार्य प्र.के. अत्रे यांच्या कन्या. ह्याही एक लेखिका आहेत. त्यांच्या पतीचे नाव सुधाकर देशपांडे. हे वांद्रे-मुंबई येथील नॅशनल कॉलेजात इंग्रजीचे प्राध्यापक तसेच उपप्राचार्य होते. २००७ साली २५ डिसेंबर या दिवशी त्यांचे ८०व्या वर्षी निधन झाले.

मीना देशपांडे यांनी लिहिलेली आणि संपादित केलेली पुस्तके

  • अश्रूंचे नाते (आचार्य अत्र्यांच्या आठवणी)
  • आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा (संपादित, अत्र्यांच्या लेखनाविषयी अनेक लेखकांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह)
  • अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी या आत्मचरित्रानंतरचे पुरवणी चरित्र (खंड ६-७-८)
  • पपा - एक महाकाव्य (सदरलेखन संग्रह)
  • मॅरिलीन मन्‍रो (अनुवादित कादंबरी)
  • मी असा झालो (आचार्य अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी ह्या पाच-खंडी आत्मचरित्रातून आणि त्यांच्याच मी कसा झालो या पुस्तकांतून निवडलेल्या उताऱ्यांचे संपादित चित्रमय संकलन, सहसंपादिका शिरीष पै)
  • ये तारुण्या ये (कथासंग्रह)
  • हुतात्मा (कादंबरी)