Jump to content

मिहान

मल्टिमोडल इंटरनॅशनल हब एरपोर्ट अ‍ॅट नागपूर, अर्थात मिहान (इंग्लिश: Multi-modal International Cargo Hub and Airport at Nagpur, रोमन लिपीतील लघुरूप: MIHAN) हा महाराष्ट्रातील नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीचा विमानतळ-प्रकल्प आहे. नागपुराच्या भारतातील मध्यवर्ती स्थानाचा उपयोग करून, रस्ते व रेल्वे वाहतुकीचे जाळे जोडून सध्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मोठ्या मालवाहतूक व प्रवासी वाहतूक केंद्रामध्ये रूपांतर करणे, हे मिहान प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. भारतात चालू असलेल्या आर्थिक विकासप्रकल्पांमधल्या चालू प्रकल्पांमध्ये हा सर्वाधिक गुंतवणुकीचा प्रकल्प आहे[]. मिहान प्रकल्प आग्नेय आशियाकडीलपश्चिम आशियाकडील मालवाहतुकीसाठी महत्त्वाचा थांबा बनणार आहे. विमानउत्पादक कंपन्यांमधील अग्रगण्य अश्या बोइंग कंपनीची १८.५ कोटी अमेरिकी डॉलर गुंतवणूक या प्रकल्पासाठी प्रस्तावित आहे[ संदर्भ हवा ].

नागपूरचे भौगोलिक स्थान बघता मुंबईऐवजी विमानांना इंधन भरण्यासाठी नागपूरला विकसित करण्याची कल्पना होती. पुढे विमानांची देखभाल-दुरुस्ती करण्याबाबत विचार होऊ लागला. त्यानंतर मालवाहतूक केंद्र, अर्थात कार्गो हब, विकसवण्याचा आराखडा तयार करण्यात आला. मालवाहतूक केंद्राची उपयुक्ततता वाढावी, म्हणून आता विशेष आर्थिक क्षेत्र आणण्यात आले[ संदर्भ हवा ].

प्रकल्प व्यवस्थापन

फेब्रुवारी, इ.स. २००६ मध्ये भारतीय केंद्रशासन आणि महाराष्ट्र शासन यांच्यादरम्यान नागपूर विमानतळ हस्तांतरित करण्याचा करार करण्यात आला होता. नागपूरच्या मिहान प्रकल्पाचे व्यवस्थापण सांभाळण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांनी एकत्र येऊन २२ फेब्रुवारी, इ.स. २००९ रोजी मिहान इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची संयुक्त कंपनी स्थापली आहे. ९ जून, इ.स. २००९ रोजी नागपुरात कंपनीची नोंदणी करण्यात आली होती. या कंपनीत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची ५१ %, तर भारतीय विमानतळ प्राधिकरणाची ४९ % भागी राहणार आहे.

प्रकल्प तपशील

विशेष आर्थिक क्षेत्र

२०८६ हेक्टरचे नवीन एसईझेड, भारतातील सर्वात मोठे बहु-उत्पादनविशेष आर्थिक क्षेत्र, विमानतळाच्या बाजूने बांधले जात आहे.२०८६ हेक्टर पैकी १४७२ हेक्टर विविध प्रक्रिया घटक स्थापन करण्यासाठी वापरीत आहे आणि उर्वरित ६१४ हेक्टर सेवा क्षेत्राच्या घटकांसाठी वापरीत आहेत. [] सर्व विशेष आर्थिक क्षेत्रांप्रमाणे, येथे गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन आणि अल्प कर धोरण मांडले आहे. या घटकांसाठी सुरुवातीची संस्थापना सामग्री आणि नंतर कच्चा माल शुल्कामुक्त आहे. []

या विशेष आर्थिक क्षेत्राचे प्रमुख विभाग आहेत:

माहिती तंत्रज्ञान पार्क ५०० हेक्टरमध्ये पसरलेले आहे आणि यात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांसाठी सर्व आवश्यक पायाभूत सुविधांचा समावेश आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि हेक्सावेअर सारख्या अनेक तंत्रज्ञान कंपन्यांनी कामकाज सुरू केले आहे आणि विस्तारत आहेत. इन्फोसिस आणि टेक महिंद्रा आपले परिक्षेत्र बांधत आहेत. हेल्थ सिटी ४९ हेक्टरमध्ये पसरलेली असून यात एम्स, इंडो-यूके हेल्थ मेडिसिटी आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट सारख्या प्रचारकांसाठी आणि वैद्यकीय तंत्रज्ञांसाठी प्रशिक्षण संस्थांसह बहुविशेषता रुग्णालय आहेत. [] वास्तुनिर्माण उद्योग ज्यात कापड आणि वस्त्र, अन्न प्रक्रिया, फार्मास्युटिकल्स आणि बायो-मेडिकल सारख्या क्षेत्रातील उद्योगांचा येथे समावेश असेल. औषधंनिर्माता ल्युपिनने येथे फार पूर्वीपासून आपले काम सुरू केले आहे.टाटा एरोनॉटिक्स लिमिटेडचे देखील काम सुरू केले आहे. विशेष आर्थिक क्षेत्रात विविध घडामोडींचा लाभ घेण्यासाठी एसईझेडला लागून एक निवासी क्षेत्र आहे. महिंद्रा ब्लूमडेल, शिव कैलासा आणि मोराज टाउनशिप सारख्या अनेक वसाहती येथे तयार झाल्या आहेत. डी वाय पाटील इंटरनॅशनल स्कूल,दिल्ली पब्लिक स्कूल, मिहान कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिकवते. येथे गोल्फ कोर्स, फ्लाइंग क्लब आणि बहु-सिनेमागृह संकुल सारख्या इतर मनोरंजनात्मक सुविधा देखील आहेत.[]

एर इंडिया-बोइंग एमआरओ

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून खरीदलेल्या ५० एकर जागेवरील एर इंडिया-बोइंग एमआरओचे बांधकाम डिसेंबर, इ.स. २०१२ पर्यंत पुरे होणे अपेक्षित आहे. जुलै, इ.स. २०१३पासून बोइंगच्या हॅंगरांत देखभाल व दुरुस्तीसाठी विमाने येण्यास आरंभ होईल. एमआरओचे काम हे एर इंडियाच्या सहकार्याने होत असल्यामुळे या ठिकाणी सर्वप्रथम एर इंडियाच्या विमानांना प्राधान्य राहील. या एमआरओमध्ये १०,००० चौरस मीटर क्षेत्रफळाचे दोन हॅंगर व २,००० चौरस मीटर क्षेत्रफळाचा एक हॅंगर बांधले जाणार आहेत[ संदर्भ हवा ].

संदर्भ व नोंदी

  1. ^ "मिहान इज बिगेस्ट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट (मिहान सर्वांत मोठा विकासप्रकल्प आहे)" (इंग्लिश भाषेत). 2012-03-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २४ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "Modal International Hub Airport at Nagpur". madcindia.org. http://madcindia.org. 30 April 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 May 2008 रोजी पाहिले. External link in |publisher= (सहाय्य)
  3. ^ "Special Economic Zone (SEZ)". madcindia.org. http://madcindia.org. 30 April 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 May 2008 रोजी पाहिले. External link in |publisher= (सहाय्य)
  4. ^ "Modal International Hub Airport at Nagpur". madcindia.org. http://madcindia.org. 30 April 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 May 2008 रोजी पाहिले. External link in |publisher= (सहाय्य)
  5. ^ "Modal International Hub Airport at Nagpur". madcindia.org. http://madcindia.org. 30 April 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 May 2008 रोजी पाहिले. External link in |publisher= (सहाय्य)

बाह्य दुवे

या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.