मिसिमा द्वीप
मिसिमा (इंग्लिश: Misima ;) प्रशांत महासागरातील पापुआ न्यू गिनी देशाच्या मिल्ने बे प्रांतात असलेल्या लुईझिएड द्वीपसमूहा जवळचे एक ज्वालामुखीजन्य बेट आहे. २०२.५ किमी२ क्षेत्रफळाचे हे बेट व्हानातिनाईच्या उत्तरेस असून या डोंगराळ बेटावर घनदाट जंगल आहे. येथील सर्वोच्च बिंदू माउंट कोइया ताऊ १,०३६ मी उंचीवर असून हे शिखर लुईझिएड द्वीपांतील सर्वोच्च बिंदू आहे. या बेटाची लोकसंख्या ५००० च्या दरम्यान आहे.
मिसिम्यात इ.स. १९९० साली सोन्याच्या व चांदीच्या खाणी सुरू झाल्या; मात्र इ.स. २००४ साली खाणकाम बंद करण्यात आले. या बेटावर एक छोटा विमानतळ आहे. १० व्या इयत्तेपर्यंत माध्यमिक विद्यालयांची सुविधा मिसिम्यावर आहे.
संदर्भ
- मिसिमा द्वीप खाणकाम माहिती (इंग्लिश मजकूर)