मिशन इंद्रधनुष
नरेंद्र मोदी हा लेख नरेंद्र मोदी यांचेबद्दलच्या लेखमालिकेतील एक भाग आहे |
वैश्विक योगदाने
|
मिशन इंद्रधनुष ही मोहीम जे.पी. नड्डा या भारताच्या आरोग्य मंत्र्यांनी २५ डिसेंबर २०१४ रोजी विमोचित केली.[१] या योजनेचा उद्देश २ वर्षांखालील लहानग्यांचा व त्यांच्या मातांचा, सन २०२० पर्यंत, सात प्रकारच्या रोगांपासून लसीकरणाच्या माध्यमातून बचाव करणे असा आहे. या रोगांमध्ये खालील रोगांचा अंतर्भाव होतो: घटसर्प (डिप्थेरिया), डांग्या खोकला (हूपिंग कफ), धनुर्वात (टिटॅनस), पोलिओ, क्षयरोग, देवी व कावीळ-ब (हेपाटायटिस-बी) [२] तसेच काही निवडक राज्यांमध्ये हिमोफेलिया व इन्फ्लुएंझा (प्रकार ब) याही लसी पुरविल्या जातील.[३][४][५]
संपूर्ण लसीकरण म्हणजे किमान ९०% लसीकरणाची पातळी गाठणे अपेक्षित आहे . २००९ मध्ये हे प्रमाण ६१% होते २०१३ मध्ये ते ६५% असून २०२० अखेर ते ९०% करावयाचे आहे . वरील सात प्रकारच्या आजारावरील लस या मोफत मिळताहेत . योजनेच्या पहिल्या टप्प्यात २०१ जिल्हे निवडले होते . हा टप्पा जानेवारी २०१५ ते जून २०१५ असा होता , तो ऑगस्ट २०१५ पर्यंत राबविण्यात आला . ७ ऑक्टोबर २०१५ला योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला . शासन या योजनेत ७ लसींबरोबर आणखी ४ लसी वाढविण्याच्या विचारात आहे , या लसी -सुधारित पोलिओ ,जापानीज मेंदूज्वर ,रोटाव्हायरस लस , गोवर -रुबेला लस असतील .
संदर्भ
- ^ केंद्र सरकारने आरोग्यासंबंधी 'मिशन इंद्रधनुष' विमोचित केले Archived 2015-03-26 at the Wayback Machine. (इंग्रजी मजकूर)
- ^ इंद्रधनुष कार्यक्रमात वापरण्यात येणाऱ्या सात प्रकारच्या नवीन लसी (इंग्रजी मजकूर)
- ^ मिशन इंद्रधनुषचे पान [मृत दुवा] (इंग्रजी मजकूर)
- ^ आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांनी 'मिशन इंद्रधनुष' विमोचित केले (इंग्रजी मजकूर)
- ^ केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांनी 'मिशन इंद्रधनुष' विमोचित केले (इंग्रजी मजकूर)