मिलेट नेटवर्क ऑफ इंडिया
मिलेट नेटवर्क ऑफ इंडिया इंग्रजी: Millet Network of India (लघुरूप: मिनी) ही एक भरड धान्य उत्पादक शेतकऱ्यांना सहाय्य करणारी संस्था आहे. पारंपारिक पिकाचे गुण आणि फायदे ओळखणाऱ्या शंभर महिलांनी या 'ना नफा ना तोटा' तत्वावरील संस्थेची स्थापना केली आहे.[१] या गटाने गावातील शेतकऱ्यांना कमी पाण्याचा वापर आणि सेंद्रिय खतासह भरड धान्ये पिकवण्यास मोठी मदत केली आहे. यांची प्रतिस्पर्धा ही भातासारख्या पिकाशी होती, ज्याला सरकारी अनुदानाचा फायदा भेटतो. जेव्हा की भरड धान्ये पिकवताना असा कोणताही सरकारी आधार या शेतकऱ्यांना भेटत नव्हता. यामुळे या संस्थेला नारी शक्ती पुरस्कार आणि 'इक्वेटर अवार्ड' असे दोन पुरस्कार मिळाले आहेत.
पार्श्वभूमी
भरड धान्य हे भारतातील एक पारंपारिक धान्य आहे. ही धान्ये पिकवण्यास मिलेट नेटवर्क ऑफ इंडिया प्रोत्साहन देते. यामागील मुख्य कारण हे पीक इतर पिकांच्या तुलनेत कमी पाण्यात वाढते. याला खते आणि फवारणी ची जवळपास गरज पडत नाही. भरड धान्ये निकृष्ट जमिनीवर पिकावता येतात. शिवाय, यावर रोग देखील कमी पडतात. तसेच कापणी केलेले पीक बऱ्याच काळासाठी साठवून ठेवता येते.[२] भरड धान्याला सेंद्रिय/नैसर्गिक खते देता येतात, तरीपण फारसे शेतकरी अजूनही ही धान्ये पिकवत नाहीत, कारण यांना मागणी कमी आहे. दक्षिण भारतात, जिथे ही संस्था काम करते त्या भागात तांदूळ अधिक लोकप्रिय आहे आणि तांदूळ पिकवण्यासाठी सरकारी अनुदान देखील मिळते.[२]
इस. २०१६ मध्ये, हा समूह यासाठी प्रयत्न करत होते आणि बाजरीला कायद्याद्वारे मान्यता मिळावी यासाठी सरकारकडे लॉबिंग करत होते. त्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात सुधारणा करायची होती जेणेकरून गरिबांना उपलब्ध होणाऱ्या अनुदानित अन्नामध्ये भरड धान्याचा समावेश केला जाईल. महिनाभर चाललेली ही मोहीम जागतिक अन्न दिनाच्या दिवशी समाप्त होण्यासाठी आखण्यात आली होती.[३]
२०१८ पर्यंत, नेटवर्कचे ५,००० सदस्य झाले होते.[१] आणि मोघुलम्माला २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी नेटवर्कच्या वतीने नारी शक्ती पुरस्कार मिळाला होता.[४] हा महिलांसाठीचा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे, जो महिला सशक्तीकरणातील उत्कृष्ट योगदानासाठी दिला जातो आणि भारताचे तत्कालीन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी ८ मार्च २०१८ रोजी मोघुलम्माला प्रदान केला. हे नेटवर्क संपूर्ण भारतातील ३९ प्राप्तकर्त्यांपैकी एक होते.[५] पुरस्कार स्वीकारणाऱ्या मुगुलम्मा ३६ वर्षांच्या असून त्यांचे पती आणि सासू मरण पावल्यानंतर पूर्णवेळ शेतकरी म्हणून काम करत आहेत. त्यांच्या सासूनेच त्यांना या मिलेट नेटवर्कशी जोडले होते आणि सेंद्रिय पद्धतीने भरड धान्ये पिकवण्यावर लक्ष वेधले होते. हे नेटवर्क कीड नियंत्रण आणि गांडूळ खत, शेणखत आणि पंचगव्याच्या सेंद्रिय वापरावर सल्ला आणि मार्गदर्शन देते. २०१९ मध्ये मोघुलम्मा युनेस्कोकडून 'इक्वेटर अवार्ड' घेण्यासाठी न्यू यॉर्कला देखील गेल्या होत्या.[६]
संदर्भ
- ^ a b PIB India (8 March 2018). "Nari Shatki Puraskar citation". PIB India via Twitter. 21 February 2021 रोजी पाहिले.
- ^ a b Nagaland, Anne Pinto-Rodrigues in (2020-02-25). "Against the grain: why millet is making a comeback in rural India". the Guardian (इंग्रजी भाषेत). 2021-02-21 रोजी पाहिले.
- ^ Kurmanath, K. V. "Millet Network launches national campaign to include grain in PDS". @businessline (इंग्रजी भाषेत). 2021-02-21 रोजी पाहिले.
- ^ "Millet Network of India's success story". The Hindu (इंग्रजी भाषेत). Special Correspondent. 2018-03-10. ISSN 0971-751X. 2021-02-21 रोजी पाहिले.CS1 maint: others (link)
- ^ "International Women's Day: President Kovind honours 39 achievers with 'Nari Shakti Puraskar'". The New Indian Express. 2018-03-09. 2018-04-04 रोजी पाहिले.
- ^ Roy, Subir. "How millet farming empowers women". @businessline (इंग्रजी भाषेत). 2021-02-21 रोजी पाहिले.