मिलिंद पराडकर
डॉ. मिलिंद दत्तात्रेय पराडकर हे गडकिल्ले या विषयावर संशोधनपूर्वक लिहिणारे एक मराठी लेखक आहेत. ‘लोकसत्ता’च्या वास्तुरंग पुरवणीत जानेवारी २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत पराडकर यांनी लिहिलेली, ‘दुर्ग’या विषयाचा ऊहापोह करणारी एक दीर्घ लेखमाला ‘दुर्गविधानम्’ या नावानं प्रकाशित झाली होती. ‘दुर्ग’ या संकल्पनेच्या जन्मापासून ते अठराव्या शतकापर्यंत या संकल्पनेने घेतलेली विविध रूपे यांची शास्त्रीय मांडणी या ‘दुर्गविधानम्’ लेखमालेच्या सव्वीस भागात करण्यात आली. वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेली ही लेखमाला १९ फेब्रुवारी २०२० रोजी, शिवजयंतीच्या निमित्ताने, विख्यात अभिनेत्री व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णींच्या हस्ते पुस्तकरूपात प्रकाशित झाली.
मिलिंद पराडकर यांनी लिहिलेली पुस्तके
- गडपुरुष (दीर्घकथा)
- दुर्गविधानम् (संशोधनात्मक ग्रंथ, नीलचंपा प्रकाशन, २०२०)
- देवाचं देणं (कादंबरी)
- प्राचीन भारतीय दुर्गशास्त्र आणि हिंदवी स्वराज्याच्या दोन राजधान्या, राजगड व रायगड : एक तुलनात्मक अभ्यास (पृष्ठसंख्या ५०४; प्रकाशक - नीलचंपा प्रकाशन, २०११)