मिलिंद (मिनँडर पहिला)
मिलिंद (मिनांडर १) | ||
---|---|---|
भारतीय-ग्रीक सम्राट | ||
मिलिंदचे चित्र | ||
अधिकारकाळ | इ.स.पू. १६५/१५५ – इ.स.पू. १३० | |
राज्यव्याप्ती | अफगाणिस्तान पाकिस्तान भारत | |
जन्म | इ.स.पू. २०६ | |
कलासी, Alexandria of the Caucasus (सध्या बग्राम, अफगाणिस्तान)[१] | ||
मृत्यू | इ.स.पू. १३० | |
पूर्वाधिकारी | अंटीमाचूस २ | |
उत्तराधिकारी | स्ट्रटो १ | |
वडील | हेलियोकल | |
आई | दिमीत्री | |
पत्नी | अभभोक्लेइया | |
संतती | स्ट्रटो १, स्ट्रटो २ | |
राजघराणे | युथिडीमसचे घराणे | |
धर्म | बौद्ध धर्म |
मिलिंद (इ.स.पू. २०६ - इ.स.पू. १४०) हा ग्रीक वंशीय भारतीय राजा होता. हा पंजाबवर साधारपणे इ.स.पू. १६० ते इ.स.पू. १४० पर्यंत राज्य करणाऱ्या यवन राजांमध्ये सर्वात उल्लेखनीय राजा होता. याला मिलिंदच्या व्यतिरिक्त इतर अनेक नावांनी जसे-, 'मीनॅंडर', मीनॅंडर पहिला किंवा 'मीनांडर' इत्यादींनी सुद्धा ओळखले जाते. याचे विविध प्रकारचे अनेक सिक्के उत्तर भारताच्या विस्तृत क्षेत्रांमध्ये, इथपर्यंत की यमुनेच्या दक्षिणेत सुद्धा मिळतात. मिलिंदने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. प्रसिद्ध बौद्ध ग्रंथ 'मिलिंदपन्ह' (मिलिंद प्रश्न) मध्ये बौद्ध भिक्खु नागसेन सोबत त्याचे संवादात्मक प्रश्नोत्तर दिले गेले आहेत.
राज्य सीमा
मिलिंद पहिला पश्चिमी राजा होता, ज्याने बौद्ध धर्म स्वीकारला आणि मथुरा (उत्तर प्रदेश) वर राज्य केले. त्याच्या राज्याची सिमा बैक्ट्रिया, पंजाब, हिमाचल आणि जम्मू पासून मथुरा पर्यंत होती. डेमेट्रियस सारखा मिलिंद नावाचा यवन राजाचे सुद्धा अनेक सिक्के उत्तर-पश्चिम भारतात उपलब्ध झाले आहेत. त्याची राजधानी 'शाकल' (सियालकोट) होती. भारतात राज्य करतांना तो बौद्ध श्रमणांच्या संपर्कात आला आणि आचार्य नागसेन स्थवीर कडून त्याने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. मिलिंदचे राज्य यमुना पासून आमू (वक्षु) दरी पर्यंत पसरलेले होते. यद्यपि त्याची एक राजधानी बलख (वाहलीक) सुद्धा होती, परंतु इतर परंपरेनुसार मुख्य राजधानी सागल (स्यालकोट) नगरी होती.
बौद्ध अनुयायी
प्लूतार्क ने लिहिले आहे की, मिलिंद मोठा न्यायी, विद्वान आणि लोकप्रिय राजा होता. त्याच्या मृत्यु नंतर त्याच्या अस्त्यांवर मोठे-मोठे स्तूप बनवले गेले. मिलिंदला शास्त्र चर्चा आणि वादविवादाची मोठी सवय होती, आणि साधारण पंडित त्याच्या समोर टिकू शकत नव्हते. बौद्ध ग्रंथांत याचे नाव मिलिंद आले आहे. 'मिलिंद पन्ह' या पाली ग्रंथात त्याच्या बौद्ध धर्म स्वीकार करण्याचे विवरण दिले गेले आहे. त्याने अनेक सिक्क्यांवर बौद्ध धर्माच्या 'धम्मचक्र प्रवर्तन'चे चिह्न 'धम्मचक्र' बनलेले आहे, आणि त्याने आपल्या नावासोबत 'ध्रमिक' (धार्मिक) विशेषण दिले आहे.
भारतावर आक्रमण
यूनानी लेखक स्ट्रैबोच्या लेखांवरून समझते की, डेमेट्रियसच्या भारत आक्रमणामध्ये मिलिंद त्याचा सहयोगी होता. स्ट्रैबो अनुसार या विजयाचा लाभ काही मिलिंद ने आणि काही युथिडिमासचा मुलगा डेमेट्रियस ने प्राप्त केला होता. यावरून अनेक इतिहासकारांनी हा अर्थ काढला की, मिलिंद और डेमेट्रियस यांनी एकाच वेळी संयुक्त रूपात भारतावर आक्रमण केले होते, आणि मिलिंद डेमेट्रियसचाच सेनापती होता. श्री टार्न या मताच्या प्रमुख प्रतिपादकांत आहेत. नंतर मिलिंदने सुद्धा आपला पृथक(?) व स्वतंत्र राज्य स्थापित केले. इंडो-यूनानी राज्यकर्त्यात डेमेट्रियस पेक्षा मिलिंद निसंदेह सर्वात योग्य राज्यकर्ता वा सम्राट होता.
साम्राज्य विस्तार
मिलिंदपन्हमध्ये, मिलिंद आणि बौद्ध भिक्खु नागसेन यांच्यामधील विवाद आणि त्याच्या परिणामाने मिलिंद ने बौद्ध धर्म स्वीकारला, या कथेचे वर्णन आहे. मिलिंदने भारतात आपल्या राज्य सीमांच्या विस्तारासोबतच प्रशासनला स्थायित्व प्रदान केले. मिलिन्दचा अधिकार स्वातघाट, हजार जिल्हा व पंजाबात रावी नदी पर्यंत होता. स्ट्रैबोच्या वर्णनानुसार यूनानींनी गंगा घाटी आणि पाटलिपुत्र पर्यंत आक्रमण केले. महाभाष्यच्या वर्णनांच्या आधारावर मानले जाऊ शकते कि, यूनानीनीं अवध(?)चे साकेत, राजस्थानात चित्तौड जवळ स्थित 'माध्यमिका'वर हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला होता. मिलिंदचे नाणे उत्तर मध्ये काबुल पर्यंत आणि दिल्ली ते मथुरा पर्यंत मिळलेले आहेत.
नाणी
पेरीप्लस नुसार मिलिंद राजाची नाणी भडौचच्या बाजारात खूप प्रसिद्ध होती. त्यांच्या कतिपय कांस्य धातूच्या नाण्यांवर धम्मचक्र प्रतीक 'महरजत धमिकस' प्रचलित होते. 'मिलिन्दपन्ह'च्या उल्लेखानुसार साकेत मिलिंद राजाची राजधानी होती. साकल तत्कालीन शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते. तसेच तेथील आर्थिक सुबत्ता व संपन्नता पाटलीपुत्र समान होती. मिलिंद राजाच्या कांस्य नाण्यांवर धम्मचक्राचे चिह्न आढळते. मथुरा येथे त्यांचे तसेच त्यांचा पुत्र स्टेटो यांचे नाणी मिळाले आहेत.
सीथियन (शक) आक्रमण
कालांतराने मध्य अशियाचे भटक्या टोळक्यांनी ज्यात 'सीथियन' लोकही होते., बैक्ट्रियाप्रांतावर हल्ला चढवला होता. चीनचे सम्राट शी-हुआंग-टी द्वारा तिसऱ्या शतकात चीनची विशाल भिंत बनवण्याचे कारण हे आक्रमण रोखने हा देखील हेतू होता. ज्यामुळे सीथियन लोकांना विस्थापित होऊन भारताच्या इण्डो-ग्रीक भागावर आक्रमण करावे लागले होते. सीथियन म्हणजेच भारतीय इतिहासात शक टोळ्या होय.
हे सुद्धा पहा
- ग्रीक
- अशोक
- हर्षवर्धन
- कनिष्क
बाह्य दुवे
- मिलिंद प्रश्न (पीडीएफ स्वरूपातील ग्रंथ) Archived 2017-02-07 at the Wayback Machine.
संदर्भ
- ^ "Menander". Encyclopædia Britannica Online. Encyclopædia Britannica, Inc. 8 September 2012 रोजी पाहिले.