Jump to content

मिरची

मिरचीचे झाड

मिरची हे उष्ण कटिबंधीय अमेरिका येथील फळ आहे असे मानले जाते. याची चव तिखट असते. हे फळ रंगाने बहुदा हिरवे असते. परंतु पिवळ्या व लाल रंगातही येते. याची पाने गुळगुळीत, एकाआड एक अशी येतात. मिरचीच्या फळांमध्ये अ, ब, क आणि ई जीवनसत्त्वे असतात. तसेच यात कॅल्शिअम, फॉस्फरस ही खनिजे असतात. मिरचीमध्ये असलेल्या कॅपसायसीन नावाच्या पदार्थामुळे मिरचीला तिखट चव प्राप्त होते.

लागवड

दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, इजिप्त, स्पेन, चीन, जपान, व्हिएतनाम, ब्रह्मदेश, मलेशिया, इंडोनेशिया, पाकिस्तान या देशात मिरची लागवड केली जाते. मिरचीच्या उत्पादनाच्या बाबतीत जगात भारताचा पहिला क्रमांक आहे. महाराष्ट्रात नंदुरबार हे मिरचीच्या बाजारपेठेचे प्रमुख शहर म्हणून ओळखले जाते. या जिल्ह्यात मिरची पिकासाठी पोषक वातावरण असल्याने मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. नंदुरबारमध्ये ओली मिरची पथाऱ्या करून वाळवून प्रक्रिया केली जाते. नंदुरबारच्या मिरचीला तिखटपणा, टिकण्याची क्षमता, वैशिष्ट्यपूर्ण रंग आणि चव यामुळे परराज्यातून विशेष मागणी असते.[] ऑक्टोबरपासून सुरू होणारा मिरचीचा हंगाम हा फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत असतो.

मिरच्यांच्या जाती

  • अग्निरेखा
  • काश्मिरी
  • जयंती
  • ज्वाला
  • २७५
  • नंदिता रोशनी
  • पंत सी १
  • पांडी
  • फुले ज्योती
  • फुले सई
  • ब्याडगी
  • ब्लॅक सीड
  • मुसळेवाडी सिलेक्‍शन
  • लवंगी
  • संकेश्‍वरी
मिरचीचे झुडुप

मिरचीचे लाल तिखट बनविण्याची पद्धत

मिरची पिकल्यावर लाल होते, पण ओलसरच राहते. तिला मग उन्हात नीट वाळवून पूर्णपणे सुकल्यावर कुटून तिचे स्वयंपाकात वापरावयाचे लाल तिखट बनते. शेतांत लावण्यासाठी सध्या मिरचीची अनेक वाणे उपलब्ध आहेत; अग्निरेखा, नंदिता रोशनी, ज्वाला, जयंती, २७५, ब्लॅक सीड इत्यादी अशी त्यांची नावे आहेत. नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर येथे, कुही तालुक्यात व मांढळ येथे, तर अचलपूरच्या पथरोट या गावीही मिरचीचे उत्पादन घेतले जाते.

हे सुद्धा पहा

चित्रदालन

  1. ^ https://www.loksatta.com/maharashtra-news/chilli-cultivation-reduces-in-nandurbar-zws-70-2083637/