मिरकल ड्रग आणि मोल्डी मेरी
विज्ञानामध्ये लागलेल्या अगदी अनपेक्षित पण मानव जातीला वरदान असलेल्या संशोधनामध्ये सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी शोधलेले 'मिरॅकल ड्रग' वेगवेगळ्या रोगापासून मुक्ती देणारे रामबाण औषध , पेनिसिलिनचा आवर्जून उल्लेख करावा लागेल आणि त्या पेनिसिलिनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी मेरी हॉट यांचा खारीचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. सेंट मेरी हॉस्पिटल लंडन येथे प्रोफेसर म्हणून कार्यरत असलेले 5सर अलेक्झांडर फ्लेमिंग सुटयानंतर ३ सप्टेंबर १९२८ मध्ये जेव्हा प्रयोग शाळेत दाखल झाले तेव्हा त्यांच्या प्रयोगातील स्तफायलोकोकस ओरियस या जिवाणूंच्या पेट्री डिशमध्ये काही वेगळ्या सजीवांची वाढ झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आणि ह्या वाढीच्या आजूबाजूची स्तफायलोकोकसची वाढ थांबलेली दिसली. ह्या सजीवांची गाठीसारखी वाढ ( bolb of growth) अभ्यासली असता ती पेनिसिलियम नोत्यातम (Penicillium notatum) ह्या बुरशीची असल्याचे सिद्ध झाले. ह्या बुरशीची वाढीदरम्यान ते आजूबाजूला जे द्रव्य पेशीबाहेर टाकतात ते वेगवेगळ्या रोगाच्या जीवांचा असलेले पेनिसिलन हे प्रतिजैविक होय. फार पूर्वीपासून वेगवेगळे आजार बरे करण्यासाठी जुने इजिप्शियन लोक जखमांवर बुरशी वाढलेली ब्रेडचे तुकडे लावत असत ह्या मागील कार्यकारणभाव सर अलेक्झांडर फ्लेमिंग ह्यांच्या संशोधनाने जगासमोर आले. पुढे वैद्यकीय चाचण्यासाठी पुरेसे पडेल एवढे पेनिसिलिन निर्माण करण्यात आलेल्या अडचणीमुळे सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी आपले पुढील संशोधन स्थगित केले. ह्या संशोधनात पुढे जास्त प्रसिद्ध नसलेली मेरी हॉंट (mary hont) हिचे योगदान प्रतिजैविके मोठ्या प्रमाणात निर्माण करण्याच्या दृष्टिने मोलाचे ठरले. एलिनॉइस येथील नॉर्थन रिसर्च लॅब (Illionois Northan research लॅब) मधिल त्यांच्या संशोधनाचा पेनिसिलिन निर्मितीत खारीचा पण महत्त्वपूर्ण वाटा आहे. सदरील प्रयोग शाळेमधे बुरशीबाबत संशोधनासाठी मेरी हॉंट यांची नियुक्ती होती. ह्या संशोधनात झोकून काम करणाऱ्या मेरी ह्या त्याकाळी शहरांमधून वेगवेगळ्या खराब होत असलेल्या वस्तू मधून बुरशीत प्रगती शोधत असत. सदरील कामात त्यांनी एक खराब झालेल्या खरबुजातून (Cantolopue melon) पेनिसिलिम क्रायसोजीमन ही प्रजाती मिळवली(penicillium chrysogenum) पुढे होवॉर्ड फ्लेरी , अर्नेस्ट चैन यांनी ह्या विषयावर आधीक संशोधन करून औद्योकीक स्तरावर पेनिसिलिनची निर्मिती यशश्विरित्या करण्यासाठी संशोधन केले . मेरी होन्ट यांच्या बुरशी शोधण्याच्या ह्या अनमोल कार्यामुळे त्यांचा उल्लेख मोल्डी मेरी असा करण्यात येतो.