Jump to content

मिठी नदी

मिठी नदी

मिठी नदी ही भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक नदी आहे. मुंबईच्या साळशेत बेटावरील (Solsette) ही नदी विहार आणि पवई तलावांतून सुरू होते व बोरीवली नॅशनल पार्कमधून वहात वहात माहीमच्या खाडीस मिळते. मिठी म्हणजे मराठीत कडकडून मिठी मारणे किंवा आलिंगन देणे अशी ही समुद्राला आलिंगन देणारी नदी प्रदूषणाला आलिंगन देऊन बसली आहे,जी नदी मीठ जेथे भेटते तिथे उगम पावते ती मिठी उर्दू शब्द मिठी म्हणजे गोड आणि मिठी याचा ऐतिहासिक संबंध काहीही नाही कारण सर्व गोड पाण्याच्या नद्या समुद्राला मिळतात.तिला श्रद्धानंद नाला, लेलेवाडी नाला, ओबेरॉय नाला, कृष्णनगर नाला, जरीमरी नाला आणि वाकोला नाला हे सहा नाले मिळतात. या नाल्यांलगत असणाऱ्या वस्त्यांमधून मोठ्या प्रमाणात घनकचरा आणि सांडपाणी सोडले जात असल्याने, मिठीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे ‘वॉचडॉग फाऊंडेशन’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. याशिवाय ‘नॅशनल वॉटर मॉनिटरिंग प्रोजेक्ट’अंतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत नदीत ‘बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड’ व ‘केमिकल ऑक्सिजन डिमांड’ मर्यादित प्रमाणापेक्षा धोकादायक स्तरापर्यंत वाढल्याची माहिती आहे. जोपर्यंत नदी नॅशनल पार्कमध्ये असते तोपर्य़ंत ती स्वच्छ असते, आणि पार्कमधून बाहेर पडताच दूषित होते.

मुंबईचा विमानतळ बांधायच्या वेळी हिचे पात्र बदलण्यात आले. परिणामी दरवर्षी मिठीला पूर येतो आणि घरांचे भरपूर नुकसान होते

मिठीच्या पुनरुज्जीवनासाठी मिठी नदी प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे.