Jump to content

मिझो नॅशनल फ्रंट

मिझो नॅशनल फ्रंट
पक्षाध्यक्षझोरामथंगा
लोकसभेमधील पक्षनेतासी. लालरोसांगा
स्थापना१९६१
संस्थापकलालडेंगा
मुख्यालयऐझॉल, मिझोरम
युतीराष्ट्रीय लोकशाही आघाडी
लोकसभेमधील जागा
१ / ५४५
राज्यसभेमधील जागा
१ / २४५
विधानसभेमधील जागा
२७ / ४०
(मिझोरम)
संकेतस्थळmnfparty.in

मिझो नॅशनल फ्रंट हा भारत देशाच्या मिझोरम राज्यामधील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. १९६१ साली लालडेंगा ह्यांच्या नेतृत्वाखाली मिझो लोकांसाठी स्थापन झालेली मिझो नॅशनल फ्रंट ही भारत सरकारच्या विरोधात एक सशस्त्र क्रांतीकारी चळवळ होती. १९८६ साली भारत सरकारसोबत शांतीकरारावर सह्या करून मिझो नॅशनल फ्रंटने आपले आंदोलन मागे घेतले व १९८७ सालच्या मिझोरम राज्य स्थापनेनंतर त्याला एक प्रादेशिक राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली. आजवर तीनवेळा हा पक्ष मिझोरमच्या सत्तेवर राहिला असून पक्षाचे अध्यक्ष झोरामथंगा मिझोरमचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

२०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये देखील मिझोरम लोकसभा मतदारसंघामधून मिझो नॅशनल फ्रंटचा उमेदवार निवडून आला. आजच्या घडीला हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहे.

बाह्य दुवे