Jump to content

मिंगशिंग चित्रपट कंपनी

मिंगशिंग यिंगप्यान गोंग्शी ऊर्फ मिंगशिंग चित्रपट कंपनी (पारंपरिक चिनी लिपी: 明星影片公司; पिन्यिन: Míngxīng yǐngpiàn gōngsī; शब्दशः अर्थ: "तेजस्वी तारा चित्रपट कंपनी") ही इ.स. १९२० व १९३० च्या दशकांत चिनी चित्रपट-निर्मितीच्या क्षेत्रातील एक अग्रणी कंपनी होती. १९२२ साली स्थापलेली ही कंपनी १९३७ साली दुसऱ्या चीन-जपान युद्धामुळे बंद पडेपर्यंत पंधरा वर्षे चित्रपट-निर्मिती करत होती.