Jump to content

मिंग राजवंश

सम्राट योंग्ल याच्या कारकिर्दीत विस्तार सर्वाधिक वाढला असताना मिंग साम्राज्याची राज्यव्याप्ती दाखवणारा नकाशा (मजकूर : इंग्लिश)

मिंग राजवंश (सोपी चिनी लिपी: 明朝; पिन्यिन: Míng Cháo, IPA: [mǐŋ tʂʰɑ̌ʊ̯]), किंवा महान मिंगांचे साम्राज्य (सोपी चिनी लिपी: 大明国; पारंपरिक चिनी लिपी: 大明國; पिन्यिन: Dà Míng Guó) हा मंगोल-प्रभावित युआन राजवंशाच्या कालखंडानंतर इ.स. १३६८ ते इ.स. १६४४ या कालखंडात चिनावर राज्य करणारा राजवंश होता.